शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
2
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
3
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
4
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
5
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
6
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
7
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
8
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
9
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
10
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
11
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
12
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
13
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
14
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
15
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
16
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
17
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
18
अमेरिकेची सात विमाने शस्त्रास्त्रांसह इस्लामाबादमध्ये दाखल; इराणच्या राष्ट्रपतींनी केली 'ही' मोठी मागणी!
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
20
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
Daily Top 2Weekly Top 5

Bhadrapad Purnima 2024: वैवाहिक सुखासाठी भाद्रपद पौर्णिमेला करतात उमा-महेश व्रत; वाचा व्रतविधी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 14:42 IST

Bhadrapad Purnima 2024: १८ सप्टेंबर रोजी भाद्रपद पौर्णिमा आहे, वैवाहिक सुखासाठी विष्णूंनीदेखील जे व्रत केले, त्याची सविस्तर माहिती जाणून घ्या. 

यंदा शनिवारी १८ सप्टेंबर रोजी भाद्रपद पौर्णिमा आहे. तिची सुरुवात आदल्या दिवशी अर्थात १७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजून ४४ मिनिटांनी सुरू होत आहे. तसेच १८ तारखेला सकाळी ८ वाजून ३ मिनिटांनी पौर्णिमा संपली की त्याच दिवसापासून महालय प्रारंभ अर्थात पितृपक्ष सुरू होणार आहे. या पौर्णिमेच्या दिवशी उमा महेश्वराचे व्रत केले जाते. पण का? कशासाठी? याबद्दल सविस्तर माहितीसकट जाणून घेऊया व्रतविधी आणि व्रतकथा!

एकदा दुर्वास मुनी फिरत फिरत वैकुंठी पोहोचले. त्यावेळी त्यांच्याकडे भगवान शिवशंकरांनी दिलेली बेलाच्या पानांची एक माळ होती. ती माळ दुर्वासांनी भगवान विष्णुंना दिली. परंतु विष्णूंनी ती माळ स्वत:च्या गळ्यात धारण न करता सहजपणे गरुडाच्या मानेवर ठेवली. ते पाहून दुर्वास रागावले. त्या रागाच्या भरात त्यांनी विष्णूंना `तू ज्या लक्ष्मीमुळे इतका गर्विष्ठ झाला आहेस, ती लक्ष्मी क्षीरसागरात बुडेल. गरुडाचाही नश होईल. तुझे वैकुंठावरील स्वामीत्व जाऊ तू देखील पृथ्वीवर भटकत फिरशील.' असा शाप दिला. त्याप्रमाणे भगवान विष्णू रानावनातून भटकू लागले. 

पुढे एकदा गौतम ऋषींची भेट झाली असता त्यांनी विष्णूला उमा महेश्वर व्रत करायला सांगितले. त्यानुसार विष्णूंनी हे व्रत केले आणि त्यांना गतवैभव प्राप्त झाले. या व्रताला शिवानंद व्रत असेही म्हणतात.

या कथेचा सारांश पाहिला तर लक्षात येते, गर्वाचे घर खाली ही म्हण देवांनाही चुकली नाही. ज्यांनी गर्व केला तो जमिनीवर आला. म्हणून थोरामोठ्यांचा मान राखून आपली कला, श्रीमंती यांचे आपण केवळ विश्वस्त आहोत हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. आणि या व्रताचे वैशिष्ट्य म्हणजे जे कैलास पती आहेत, वैराग्याचे पुतळे आहेत, ते स्वतः अलिप्त राहून दुसऱ्यांना जे हवे ते प्राप्त करून देण्यास तत्पर राहतात. अशा वेळी आपण वैभव प्राप्तीचा लोभ धरायचा की उमा महेषाप्रमाणे स्थिर आणि समाधानी वृत्ती मागायची, हे ज्याचे त्यानेच ठरवले पाहिजे! 

आजच्या काळात हे व्रत विशेष कोणी करताना आढळत नाही. परंतु इच्छुकांसाठी व्रतविधी पुढीलप्रमाणे -

हे व्रत पुरुषांनी करायचे असते. कर्नाटकात हे व्रत अधिक प्रचलित आहे. सलग पंधरा वर्षे हे व्रत केले जाते. भाद्रपद चतुर्दशीला व्रताचा संकल्प करून भगवान शिवशंकर आणि पार्वतीची पूजा करावी. उपवास करावा. शिवमूर्तीजवळ निजावे. पौर्णिमेला स्नान करून भस्म लावून, रुद्राक्ष धारण करून शिव पार्वतीच्या मूर्तीची पूजा करावी. पूजेपूर्वी पंधरा गाठी मारलेला दोरा कुंकवात बांधून देवाच्या पायाशी ठेवावा आणि पूजा झाल्यावर तो हाताला बांधावा. पंधरा मांडे किंवा पंधरा घारगे असा नैवेद्य दाखवावा. सुवासिनीला जेवू घालावे. सोळाव्या वर्षी व्रताचे उद्यापन करावे.

अलिकडच्या काळात हे व्रत अंगिकारणे शक्य वाटत नसेल, तर या दिवशी किमान उमा महेशाचे स्मरण करून देवघरातल्या मूर्तींवर अभिषेक, पूजा किंवा स्तोत्रपठण आपण नक्कीच करू शकतो. जेणेकरून त्यांची कृपादृष्टी सदैव आपणास लाभेल. 

टॅग्स :Puja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३