आर्थिक संकट, सोन्याची दरवाढ, अन्...; बाबा वेंगाने २०२६ बाबत वर्तवली होती काळजीत टाकणारी भाकितं! खरी ठरणार? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 10:48 IST2026-05-16T10:46:00+5:302026-05-16T10:48:37+5:30

Baba Venga Predictions 2026: बाबा वेंगा यांनी आपल्या भविष्यवाणीत २०२६ सालाबद्दल काही धक्कादायक भाकिते केली होती, ज्याची लक्षणे आता प्रकर्षाने जाणवू लागली आहेत.

Baba Venga Predictions 2026: Economic crisis, gold price hike, and...; Baba Venga had made a worrying prediction for 2026! Will it come true? | आर्थिक संकट, सोन्याची दरवाढ, अन्...; बाबा वेंगाने २०२६ बाबत वर्तवली होती काळजीत टाकणारी भाकितं! खरी ठरणार? 

आर्थिक संकट, सोन्याची दरवाढ, अन्...; बाबा वेंगाने २०२६ बाबत वर्तवली होती काळजीत टाकणारी भाकितं! खरी ठरणार? 

सध्याच्या जागतिक घडामोडी आणि आर्थिक अस्थिरता पाहता, जग एका मोठ्या बदलाच्या उंबरठ्यावर उभे असल्याचे जाणवत आहे. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या एका महत्त्वपूर्ण आवाहनाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. १० मे २०२६ रोजी केलेल्या भाषणात पंतप्रधानांनी वाढत्या जागतिक इंधन संकटामुळे देशवासीयांना 'पेट्रोलचा वापर कमी करण्याचे' आणि 'पुढील एक वर्ष सोन्याची खरेदी टाळण्याचे' कळकळीचे आवाहन केले आहे. "राष्ट्रहितासाठी आपण सोन्याचा मोह टाळूया," असे सांगत त्यांनी परकीय चलन वाचवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्याबरोबरच परदेश प्रवास टाळा, सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून पेट्रोल बचत करा असेही म्हटले आहे. तीन रुपयांनी पेट्रोल वाढले असून आता त्याचा फटका दैनंदिन जीवनातील इतर गोष्टींनाही बसणार आहे.

हे ही वाचा : शनी जयंती २०२६: कर्माचा हिशोब अन् धनाची आवक; 'या' राशींसाठी १६ मे ठरणार गेम-चेंजर!

पंतप्रधानांचे हे व्यावहारिक आवाहन आणि सध्याची युद्धजन्य परिस्थिती पाहता, अनेक अभ्यासकांना प्रसिद्ध भविष्यवेत्त्या बाबा वेंगा (Baba Vanga) यांनी अनेक वर्षांपूर्वी केलेल्या भविष्यवाणीची आठवण येत आहे. जे केवळ तर्क मानले जात होते, ते आता प्रत्यक्षात उतरताना दिसत आहेत. २०२६ सालासाठी बाबा वेंगा यांनी वर्तवलेली भाकिते—मग ते आर्थिक संकट असो किंवा युद्धाचे सावट—पंतप्रधानांच्या या आवाहनाशी विसंगत नसून, एका मोठ्या जागतिक संकटाची पूर्वसूचना असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यांच्या भाकितात पुढील मुद्दे नोंदवले होते. 

१. तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी?

बाबा वेंगा यांनी युरोपमध्ये एका मोठ्या संघर्षाची भविष्यवाणी केली होती. सध्या रशिया-युक्रेन आणि इस्रायल-हमास यांच्यातील वाढता तणाव पाहता, जगावर तिसऱ्या महायुद्धाचे (Third World War) सावट आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. बाबा वेंगा यांच्या मते, २०२६ पर्यंत जगातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदललेली असतील.

२. सोन्याचे गगनाला भिडणारे भाव आणि आर्थिक संकट

बाबा वेंगा यांनीही जागतिक आर्थिक मंदीचा इशारा दिला होता.

सोने: युद्धाच्या काळात सोन्याला सुरक्षित गुंतवणूक मानले जाते, त्यामुळे २०२६ पर्यंत सोन्याचे दर ऐतिहासिक उच्चांक गाठू शकतात.

पेट्रोल: ऊर्जा संकटाचा सामना करताना जगाला इंधनासाठी मोठी किंमत मोजावी लागेल, ज्याचा थेट परिणाम सामान्य माणसाच्या खिशावर होईल असे म्हटले होते आणि सध्याचे चित्र तेच दर्शवत आहे. 

हे ही वाचा : Adhik Maas 2026: अधिक मासाला 'धोंड्याचा' मास म्हणण्यामागे काय आहे नेमके कारण?

३. नैसर्गिक आपत्ती आणि हवामान बदल

बाबा वेंगा यांनी सांगितले होते की, पृथ्वीच्या कक्षेत बदल होतील आणि मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक आपत्ती येतील. सध्या आपण अनुभवत असलेल्या उष्णतेच्या लाटा, अवकाळी पाऊस आणि समुद्राच्या पाणी पातळीत होणारी वाढ ही त्यांच्या भविष्यवाणीचीच लक्षणे असल्याचे मानले जात आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार कोरोनासदृश व्हायरस पुन्हा एकदा थैमान घालण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. 

यावर उपाय काय?

अर्थात हे सगळे प्रत्यक्षात घडताना दिसत असले तरी घाबरून न जाता 'व्यावहारिक तयारी' करणे गरजेचे आहे.

आर्थिक नियोजन: महागाईच्या काळात अनावश्यक खर्च टाळून बचतीवर भर दिली पाहिजे. आपल्या खर्चाचे प्राधान्यक्रम ठरवून खरेदी केली पाहिजे. छोटी छोटी बचत मोठे आर्थिक नियोजन करू शकतात. 

हे ही वाचा : Numerology: तुमची जन्मतारीख सांगेल तुमची 'ती' एक सवय; ज्यामुळे लोक तुमच्यावर होतात नाराज!

मानसिक आरोग्य: सध्याच्या नकारात्मक बातम्यांच्या काळात योगसाधनेसारख्या उपक्रमांत व्यस्त ठेवून मानसिक शांती मिळवणे हेच खरे मोठे यश आहे. या काळात एकमेकांशी सोशली नाही तर वैयक्तिक दृष्ट्या जवळ या. एकमेकांच्या साथीने भक्कम उभे राहा. समाज म्हणून संघटित व्हा. देशावर तसेच जगावर आलेले संकट एकात्मतेने परतावून लावणे सहज शक्य होईल. आपापसात द्वेष न ठेवता परिस्थितीचे गांभीर्य जाणून घेत एकमेकांसोबत उभे राहा.

Web Title : आर्थिक संकट, सोने की कीमतों में वृद्धि, और बाबा वेंगा की 2026 की भविष्यवाणियां।

Web Summary : आर्थिक अस्थिरता के बीच, पीएम मोदी ने पेट्रोल का उपयोग और सोने की खरीद कम करने का आग्रह किया। बाबा वेंगा की 2026 के लिए भविष्यवाणियां, जिसमें आर्थिक संकट और संभावित युद्ध शामिल हैं, गूंजती हैं। सोने की उच्च कीमतें, ऊर्जा संकट और प्राकृतिक आपदाओं का खतरा मंडरा रहा है। व्यावहारिक तैयारी, वित्तीय योजना और मानसिक कल्याण महत्वपूर्ण हैं।

Web Title : Economic crisis, gold price hike, and Baba Vanga's 2026 predictions.

Web Summary : Amid economic instability, PM Modi urged reduced petrol use and gold buying. Baba Vanga's predictions for 2026, including economic crises and potential war, resonate. High gold prices, energy woes, and natural disasters loom. Practical preparation, financial planning, and mental well-being are crucial.