सोमवारी तळहातावरील गुरु पर्वतावर लावा हळदीचा टिळा; 'पुष्य नक्षत्रा'च्या मुहूर्तावर उघडेल भाग्याचे द्वार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 12:50 IST2026-01-03T12:49:16+5:302026-01-03T12:50:27+5:30
Astrology: ज्योतिष शास्त्रानुसार, पुष्य नक्षत्रावर केलेले उपाय अक्षय फळ देणारे आणि अडथळे दूर करणारे मानले जातात; सोमवार ५ जानेवारी रोजी तुम्हीही लाभ घ्या!

सोमवारी तळहातावरील गुरु पर्वतावर लावा हळदीचा टिळा; 'पुष्य नक्षत्रा'च्या मुहूर्तावर उघडेल भाग्याचे द्वार!
नव्या वर्षाची सुरुवात होत असतानाच नक्षत्रांचा राजा मानल्या जाणाऱ्या 'पुष्य नक्षत्राचा' दुर्मिळ योग जुळून येत आहे. हे या वर्षातील पहिलेच पुष्य नक्षत्र असल्याने त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, पुष्य नक्षत्रावर केलेले उपाय अक्षय फळ देणारे आणि अडथळे दूर करणारे मानले जातात. याबाबत ज्योतिष अभ्यासक डॉ. योगेश शर्मा यांनी दिलेला उपाय जाणून घ्या.
Vastu Tips: २०२६ मध्ये नशीब सोन्यासारखं चमकेल, फक्त कॅलेंडरच्या प्रत्येक पानावर करा 'हा' छोटा बदल!
मुहूर्ताची नेमकी वेळ आणि वार
यंदा पुष्य नक्षत्र ४ जानेवारी, रविवारी दुपारी ३:३० वाजता सुरू होत आहे. मात्र, हे नक्षत्र रविवारी सुरू होत असले तरी सूर्योदयाला नसल्यामुळे याला 'रवी-पुष्य योग' मानले जाणार नाही. शास्त्रानुसार, नक्षत्राशी संबंधित विशेष उपाय ५ जानेवारी, सोमवार रोजी करणे अधिक फलदायी ठरेल.
अडलेली कामे मार्गी लावण्यासाठी 'शिव-उपासना'
सोमवारी पुष्य नक्षत्र असल्याने महादेवाची उपासना करणे अत्यंत शुभ आहे. ज्यांची कामे अनेक दिवसांपासून रेंगाळली आहेत किंवा ज्यांना पैशाची चणचण भासत आहे, त्यांनी खालील उपाय करावा.
विधी: सोमवारी सकाळी स्नान आटोपल्यानंतर शिवमंदिरात जा किंवा घरातील शिवलिंगावर एक मूठ तांदूळ आणि रात्रभर भिजवलेली एक मूठ चणा डाळ अर्पण करा.
प्रार्थना: हे अर्पण करताना महादेवाकडे मनापासून प्रार्थना करा की, "माझी रखडलेली सर्व कामे विनाअडथळा मार्गी लागू दे." चणा डाळ ही गुरु ग्रहाचे प्रतीक आहे आणि तांदूळ चंद्राचे, या प्रयोगामुळे 'गजकेसरी' योगासारखे फळ मिळते.
Astrology: घरात सुख-समृद्धी टिकत नाहीये? तुळशीजवळ दिवा लावताना म्हणा 'हे' ३ चमत्कारीक मंत्र
तळहातावर करा 'हा' उपाय
५ जानेवारी रोजी दिवसभरात तुम्ही एक छोटासा पण अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे:
कृती: तुमच्या हाताच्या 'गुरु पर्वतावर' (तर्जनी म्हणजेच पहिल्या बोटाच्या खाली असलेला उंच भाग) हळदीचा एक छोटा टिळा लावा.
फायदा: हळद ही भाग्योदयासाठी सर्वोत्तम मानली जाते. गुरु पर्वतावर हळद लावल्याने तुमची निर्णयक्षमता सुधारते, समाजात मान-सन्मान वाढतो आणि भाग्याची प्रबळ साथ मिळून तुमची कठीण कामेही सहज होऊ लागतात.
या उपायाचे फळ : असे मानले जाते की, पुष्य नक्षत्राच्या उर्जेमध्ये ही कृती केल्यास -
१. धन संपत्तीचे नवीन मार्ग खुले होतात.
२. व्यापार आणि नोकरीत येणारे अडथळे दूर होतात.
३. घरात सकारात्मकता आणि स्थैर्य येते. पाहा हा व्हिडीओ -