शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
2
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
3
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
4
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
5
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
6
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
7
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
8
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
9
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
11
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
12
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
13
कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
14
Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!
15
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
16
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
17
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
18
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
19
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
20
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
Daily Top 2Weekly Top 5

Angarak Sankashti Chaturthi 2026: अंगारकीला चुकवू नये 'अशी' उपासना; सहा महिन्यात मिळते इच्छित फळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 08:02 IST

Angarak Sankashti chaturthi 2026: आज ५ मे अंगारक संकष्ट चतुर्थी आहे, या मुहूर्तावर दिलेली उपासना सुरु करा आणि मनोवांछित फळ मिळावे यासाठी प्रार्थना करा. 

आज ५ मे, मंगळवार आणि संकष्ट चतुर्थी हा योग जुळून आल्याने अंगारक योग तयार झाला आहे, तिलाच आपण अंगारकी चतुर्थी(Angarak Sankashti Chaturthi 2026) असे म्हणतो. वर्षभरात साधारण सहा महिन्यांनी एकदा म्हणजे वर्षातून दोनदा हा योग जुळून येत असल्यामुळे अंगारकीला विशेष महत्त्व आहे. ज्योतिष शास्त्रानुसार ज्यांच्या पत्रिकेत मंगळ दोष आहे किंवा ज्यांना करिअरमध्ये, उत्पन्न वाढीमध्ये अडचणी येत आहेत त्यांनी अंगारकीला विशेष उपासना सुरु केली असता सहा महिन्यात चांगले फळ मिळते असे म्हटले जाते. ज्यांना तीनदा म्हणणे शक्य नाही, त्यांनी दिवसभरातून एक वेळ ठरवून एकदा तरी हे स्तोत्र अवश्य म्हणावे. लाभ होतो!

हे ही वाचा : वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!

यासाठी अंगारकीला गणेश पूजा करावी. बाप्पाला दुर्वा आणि जास्वंदाचे फुल वाहावे आणि देवर्षी नारद यांनी रचलेल्या 'संकटनाशक' स्तोत्राचे पठण करावे. हे मूळचे संस्कृत स्तोत्र कवी श्रीधर यांनी मराठीत अनुवादित केले. त्यामुळे ज्यांना संस्कृत येत नाही, त्यांनाही हे स्तोत्र पठण करणे सोपे झाले. त्यात गणरायची बारा नावे आहेत व शेवटी स्तोत्राची फलश्रुती दिली आहे. त्यात असे म्हटले आहे, की हे प्रासादिक स्तोत्र त्रिकाळ अर्थात सकाळ, दुपार, संध्याकाळ म्हटले तर त्याचे फळ निश्चित मिळते.विद्यार्थ्याला विद्या, धनार्थ्याला धन, पुत्रार्थ्याला पुत्र आणि मोक्षार्थ्याला गती मिळते असे म्हटले आहे. 

हे ही वाचा : Numerology: 'या' जन्मतारखेचे लोक असतात अति संवेदनशील; सभोवतालच्या वातावरणाचा खोलवर होतो परिणाम

हे स्तोत्र मनोभावे म्हटले असता सहा मासात या स्तोत्राची अनुभूती येते. अनेकांनी त्याचा लाभ घेतला आहे. तुम्हीही बाप्पाचे नाव घ्या आणि हे स्तोत्र तीन वेळा म्हणण्यास सुरुवात करा. स्तोत्र म्हणण्यास १ मिनिटाच्या वर वेळ लागत नाही, पण सातत्य मात्र हवं. आता तुम्ही तुमच्या सोयीची वेळ निवडून घ्या आणि तीन वेळेस ही उपासना करा. 

साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्र विनायका | भक्तिने स्मरतां नित्य आयु:कामार्थ साधती ||१||

प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत तें | तीसरेकृष्णपिंगाक्ष चवथे गजवक्त्र तें ||२||

पाचवेश्रीलंबोदर सहावे विकट नाव तें | सातवेविघ्नाराजेंद्र आठवे धुम्रवर्ण तें ||३||

नववेश्रीभालाचंद्र दहावे श्रीविनायक | अकरावेगणपति बारावे श्रीगजानन ||४||

देवनावे अशीबारा तीनसंध्या म्हणे नर | विघ्नाभिती नसेत्याला प्रभो ! तू सर्वसिद्धिद ||५||

विद्यार्थ्यालामिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन | पुत्रर्थ्यालामिळे पुत्र मोक्षर्थ्याला मिळे गति ||६||

जपतागणपति गणपतिस्तोत्र सहामासात हे फळ| एकवर्ष पूर्ण होता मिळे सिद्धि न संशय ||७||

नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे | श्रीधाराने मराठीत पठान्या अनुवादिले ||८||

English
हिंदी सारांश
Web Title : Angaraki Sankashti Chaturthi 2026: Worship for desired results in six months.

Web Summary : Angaraki Chaturthi, occurring twice yearly, is significant for those with Mangal Dosha. Recite the Sankatnashan Stotra, translated by Shridhar, offering Durva and Jaswand flowers to Lord Ganesha. Consistent recitation for six months brings desired outcomes like wealth, knowledge and progeny.
टॅग्स :Sankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थीPuja Vidhiपूजा विधीTraditional Ritualsपारंपारिक विधीganpatiगणपती 2025Indian Festivalsभारतीय उत्सव-सण