शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

आमदार प्रकाश सोळंकेंचे घर, गाड्या जाळल्यानंतर माजलगाव शहरात दगडफेक

By सोमनाथ खताळ | Updated: October 30, 2023 13:21 IST

आ.प्रकाश सोळंके यांच्या घराला आग लावल्यानंतर आंदोलकांनी माजलगाव शहरातील मुख्य रस्त्यांवर मोर्चा काढला.

बीड : राष्ट्रवादीचे आ.प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक करून गाड्या व घरातील साहित्य जाळण्यात आले. त्यानंतर मराठा समाजबांधवांनी घोषणाबाजी करत माजलगाव शहरातील मुख्य मार्गांवरून रॅली काढली. यावेळी दगडफेकही करण्यात आली. यामुळे माजलगाव शहरात सध्या तणावाचे वातावरण आहे.

आ.प्रकाश सोळंके यांची एक कथीत ऑडीओ क्लीप सोशल मिडीयावर व्हायरल झाली होती. त्याचे पडसाद सोमवारी सकाळी उमटले. मराठा समाजबांधवांनी आक्रमक होत मोर्चा आ.सोळंके यांच्या घरावर नेला. तेथे समाजबांधवांनी दगडफेक केली. त्यानंतर घरात शिरून साहित्य बाहेर काढत घरालाच आग लावली. त्यानंतर बाहेर त्यांच्या गाड्याही पेटविण्यात आल्या. ही आग शमविण्यासाठी अग्निशमन विभागाच्या गाड्या बोलावण्यात आल्या. परंतू आंदोलकांनी या गाड्या रस्त्यातच अडवल्या. त्यामुळे साहित्य व गाड्या आगीत खाक झाल्या.

Video: राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक, गाड्याही पेटवल्या

दरम्यान, घराला आग लावल्यानंतर आंदोलकांनी माजलगाव शहरातील मुख्य रस्त्यांवर मोर्चा काढला. यावेळी दगडफेकही करण्यात आली. आंदोलकांना रोखण्यात पोलिस अपयशी ठरत आहेत. सध्या सर्वत्र तणावाचे वातावरण आहे. पोलिसांचा फौजफाटाही अपुरा असून पोलिसांकडून शांततेचे आवाहन करण्यात आले आहे.

काय म्हणतात प्रकाश सोळंके...मी मराठा समाजाचा आमदार आहे. आरक्षण मिळावे, ही माझीच इच्छा आहे. परंतू काही लोक ऑडिओ क्लीप कट करून व्हायरल करत आहेत. राजकीय विरोधक या भावंनाचा गैरफायदा घेत आहेत. सकाळी आंदोलक आले तेव्हा मी घरातच होतो. सर्व बाजूने माझ्या घराला त्यांनी वेडा टाकला होता. काही चर्चा करण्याआधीच त्यांनी दगडफेक करण्यास सुरूवात केली. राजकीय विरोधक संधी शोधून असे प्रकार करत असल्याची प्रतिक्रिया आ.प्रकाश सोळंके यांनी घरावरील दगडफेकीनंतर दिली.

टॅग्स :BeedबीडPrakash Solankeप्रकाश सोळंकेNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaratha Reservationमराठा आरक्षण