शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

एसएफआय, डीवायएफआय, जनवादी महिला संघटनेचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:20 IST

बीड : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय), डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय) व अखिल भारतीय जनवादी महिला ...

बीड : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय), डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय) व अखिल भारतीय जनवादी महिला संघटनांच्या (एडवा) वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २३ जुलै रोजी आंदोलन करण्यात आले.

शिक्षण, रोजगार, आरोग्य आणि जीवनावश्यक मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी स्वातंत्र्यसेनानी कॅप्टन लक्ष्मी सहगल यांच्या स्मृतिदिनी व क्रांतिकारक शहीद चंद्रशेखर आझाद यांच्या जन्मदिनी तिन्ही संघटनांच्यावतीने देशभरात आंदोलन करण्याची हाक देण्यात आली होती. याचाच एक भाग म्हणून बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय तसेच माजलगाव, वडवणी, परळी, अंबाजोगाई येथे हे आंदोलन केेले. आंदोलन सुरू असताना पावसाने हजेरी लावली, तरीसुद्धा आंदोलन सुरूच होते.

पीएम केअर निधीतून सार्वजनिक आरोग्याच्या पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी आणि सर्व मुलांना विनामूल्य ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी पैसे खर्च करा, सेन्ट्रल व्हिस्ता प्रकल्प रद्द करून तो पैसा देखील याच कामासाठी वापरा, सर्व शैक्षणिक फी माफ करा. गरीब आणि सामाजिकदृष्ट्या वंचित विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा, आवश्यक उपकरणे आणि इंटरनेट सेवा मोफत पुरवा, विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गातून काढून टाकणाऱ्या खासगी शाळांचे परवाने सरकारने रद्द करावेत, सर्वांना मोफत व सार्वत्रिक लस मिळालीच पाहिजे, थकीत शिष्यवृत्ती, फेलोशिप व स्वाधार योजनेची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करा, शैक्षणिक संस्था तात्काळ सुरू करून, विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहण्याची सुविधा उपलब्ध करा, यांसह इतर अनेक मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

या आंदोलनात एसएफआयचे राज्य सचिव रोहिदास जाधव, जिल्हा सचिव लहू खारगे, डीवायएफआयचे तालुका अध्यक्ष सुहास जायभाये, तालुका सचिव प्रा. डॉ. कुंडलिक खेत्री, एडवाच्या शुभांगी कुलकर्णी, एसएफआयचे तालुका सचिव अभिषेक शिंदे, किरण घाटगे, शिवा चव्हाव्ण, निखिल शिंदे, शंकर चव्हाण, मंगेश मुंडे, राहुल राठोड, संदीप गांडगे, ए. पी. कांबळे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

230721\23_2_bed_1_23072021_14.jpg

एसएफआय आंदोलन