मस्साजोग सरपंचपदासाठी दोघांत थेट लढत; अश्विनी देशमुख अन् स्वरूपानंद देशमुख रिंगणात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 14:55 IST2026-04-18T14:54:56+5:302026-04-18T14:55:02+5:30

केज तालुक्यातील मस्साजोगमध्ये राजकीय धुराळा! तिघांच्या माघारीनंतर आता सरपंचपदासाठी सरळ सामना

Massajog Sarpanch Election: Ashwini Deshmukh to Face Swarupanand Deshmukh in Direct Contest | मस्साजोग सरपंचपदासाठी दोघांत थेट लढत; अश्विनी देशमुख अन् स्वरूपानंद देशमुख रिंगणात

मस्साजोग सरपंचपदासाठी दोघांत थेट लढत; अश्विनी देशमुख अन् स्वरूपानंद देशमुख रिंगणात

केज (जि. बीड): तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंचपदाची निवडणूक बिनविरोध होणार, या चर्चेला शुक्रवारी पूर्णविराम मिळाला. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पाचपैकी तिघांनी माघार घेतल्यामुळे आता अश्विनी संतोष देशमुख आणि स्वरूपानंद विश्वनाथराव देशमुख यांच्यात थेट लढत निश्चित झाली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

तिघांची माघार, दोघांत रणसंग्राम
या पदासाठी एकूण पाच अर्ज दाखल झाले होते. मात्र, शुक्रवारी संजीवनी किरण देशमुख, पंजाब सज्जनराव देशमुख आणि करुणा स्वरूपानंद देशमुख यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. आता रिंगणात स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख आणि गेल्या निवडणुकीत अवघ्या ९ मतांनी पराभूत झालेले स्वरूपानंद देशमुख उरले आहेत.

राजकीय वारसा विरुद्ध जुना अनुभव
संतोष देशमुख यांच्या अकाली निधनामुळे निर्माण झालेली सहानुभूती अश्विनी देशमुख यांच्या पाठीशी आहे, तर दुसरीकडे गेल्या वेळी निसटता पराभव पत्करावा लागलेले स्वरूपानंद देशमुख पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरले आहेत. या चुरशीच्या लढतीमुळे गावातील राजकीय वातावरण तापले असून, ग्रामस्थ कोणाच्या पारड्यात आपले मत टाकतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Web Title : मस्साजोग सरपंच चुनाव: अश्विनी देशमुख और स्वरूपानंद देशमुख में सीधी टक्कर

Web Summary : मस्साजोग के सरपंच चुनाव में अश्विनी देशमुख और स्वरूपानंद देशमुख के बीच सीधा मुकाबला होगा। तीन उम्मीदवारों ने नाम वापस ले लिया, जिससे राजनीतिक माहौल गरमा गया है। सहानुभूति और पिछले अनुभव के कारण रिक्त सीट के चुनाव पर सबकी निगाहें टिकी हैं।

Web Title : Massa Jog Sarpanch Election: Ashwini Deshmukh and Swarupanand Deshmukh in Direct Fight

Web Summary : Massa Jog's Sarpanch election will be a direct contest between Ashwini Deshmukh, widow of the deceased, and Swarupanand Deshmukh. Three candidates withdrew, intensifying the political atmosphere. The election for the vacant seat has garnered significant attention due to sympathy and past experience factors.