भरधाव ट्रकने दुचाकीला उडवले; एकजण जागीच ठार, एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 03:24 PM2021-04-03T15:24:33+5:302021-04-03T15:24:55+5:30

शिवाजी फुलारे असे अपघातात ठार झालेल्याचे नाव असून बाबासाहेब मुकुटराव असे जखमीचे नाव आहे. 

The loaded truck blew up the bike; One killed on the spot, one injured | भरधाव ट्रकने दुचाकीला उडवले; एकजण जागीच ठार, एक जखमी

भरधाव ट्रकने दुचाकीला उडवले; एकजण जागीच ठार, एक जखमी

Next

गेवराई : शहरातून बागपिंपळगावंकडे जाणाऱ्या दुचाकीला बायपास जवळील रस्त्यावर समोरून भरधाव येणाऱ्या ट्रकने जोराची धडक दिल्याने १ जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवार दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. शिवाजी फुलारे असे अपघातात ठार झालेल्याचे नाव असून बाबासाहेब मुकुटराव असे जखमीचे नाव आहे. 

बागंपिंपळगाव येथील रहिवासी शिवाजी फुलारे आणि बाबासाहेब मुकुटराव हे गेवराई येथे काही कामानिमित्त दुचाकीवरून आले होते. दुपारी १ वाजेच्या सुमारास ते दुचाकीवरून बागपिंपळगावकडे परतत होते. यावेळी बायपास जवळ समोरून भरधाव येणाऱ्या ट्रकने ( क्रमांक जी.जे 01 सी.वाय 5475 ) त्यांना जोराची धडक दिली. यात शिवाजी फुलारे हे जागीच ठार झाले. तर  बाबासाहेब मुकुटराव हे गंभीर जखमी आहेत. जखमीला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी अद्याप गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

Web Title: The loaded truck blew up the bike; One killed on the spot, one injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.