शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये शाहीलग्नात फटाक्यांचा भीषण स्फोट; दोन फोटोग्राफर गंभीर जखमी, कॅमेरे जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 18:50 IST

आकाशात जाणारा फटाका जमिनीवरच फुटला; एकाचा चेहरा भाजला तर दुसऱ्याचा कान फाटला.

बीड : शहरातील बार्शी रोडवरील एका मंगल कार्यालयात मंगळवारी (दि. २८) सायंकाळच्या सुमारास शाही विवाह सोहळा सुरू असताना फटाक्यांच्या स्फोटाने मोठी दुर्घटना घडली. विवाह विधी पार पडल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी केली जात असताना, दारूगोळा असलेला एक मोठा फटाका आकाशात जाण्याऐवजी जमिनीवरच फुटला. या प्रचंड स्फोटात फोटोशूट करणारे दोन तरुण फोटोग्राफर गंभीररीत्या भाजले असून, त्यांचे कॅमेरेही जळून खाक झाले.

या भीषण अपघातात एका फोटोग्राफरचा चेहरा प्रचंड भाजला असून, त्याच्या एका डोळ्याला गंभीर जखम झाली आहे तर दुसऱ्या फोटोग्राफरच्या कानाचा पडदा फाटला आहे. यासोबतच त्यांचे दोन महागडे कॅमेरेही पूर्णपणे खराब झाले आहेत. जखमींना तातडीने बीड येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे.

१ मे रोजी लग्नाची गाठ; पण...दुर्दैवाची बाब म्हणजे, जखमींपैकी एका फोटोग्राफरचा विवाह १ मे रोजी होणार आहे. ऐन लग्नाच्या तोंडावर ही दुर्घटना घडली. सद्य:स्थितीत त्याच्यावर उपचार सुरू असून, त्याला केवळ लग्नाच्या विधीपुरतेच विवाहस्थळी आणले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

फटाके वाजवावेत की नाही?फटाके वाजवणे हा आनंदाचा भाग मानला जातो; परंतु बीडमध्ये २८ एप्रिल रोजी लग्नाच्या आतषबाजीदरम्यान झालेली दुर्घटना पाहता, सण किंवा उत्सवाचा आनंद दुसऱ्याच्या जिवावर बेतणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. फटाक्यांमुळे होणारे ध्वनी आणि वायुप्रदूषण तसेच आगीच्या घटना आणि शारीरिक इजा टाळण्यासाठी मर्यादा पाळणे हिताचे ठरते. विशेषतः दाट वस्तीत किंवा गर्दीच्या ठिकाणी फटाके वाजवणे टाळावे.

काय काळजी घ्यायला हवी?फटाके नेहमी खुल्या मैदानातच वाजवावेत; मंगल कार्यालयासारख्या बंदिस्त किंवा गर्दीच्या ठिकाणी आतषबाजी टाळावी. फटाका जमिनीवर फुटल्यास डोळे, कान आणि चेहऱ्याला गंभीर इजा होऊ शकते. लहान मुलांवर लक्ष ठेवावे आणि सुरक्षेसाठी पाणी, वाळू व प्रथमोपचार पेटी जवळ ठेवावी.

English
हिंदी सारांश
Web Title : Beed Wedding Fireworks Mishap: Two Photographers Severely Injured, Gear Destroyed

Web Summary : A fireworks explosion at a Beed wedding severely injured two photographers. One suffered serious facial and eye injuries, while the other's eardrum ruptured. Expensive camera equipment was destroyed. One photographer's upcoming wedding is now uncertain.
टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याfire crackerफटाके