बीडमध्ये शाहीलग्नात फटाक्यांचा भीषण स्फोट; दोन फोटोग्राफर गंभीर जखमी, कॅमेरे जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 18:50 IST2026-05-02T18:48:42+5:302026-05-02T18:50:05+5:30

आकाशात जाणारा फटाका जमिनीवरच फुटला; एकाचा चेहरा भाजला तर दुसऱ्याचा कान फाटला.

Firecracker Blast During Wedding in Beed; Two Photographers Seriously Injured, Cameras Destroyed | बीडमध्ये शाहीलग्नात फटाक्यांचा भीषण स्फोट; दोन फोटोग्राफर गंभीर जखमी, कॅमेरे जळून खाक

बीडमध्ये शाहीलग्नात फटाक्यांचा भीषण स्फोट; दोन फोटोग्राफर गंभीर जखमी, कॅमेरे जळून खाक

बीड : शहरातील बार्शी रोडवरील एका मंगल कार्यालयात मंगळवारी (दि. २८) सायंकाळच्या सुमारास शाही विवाह सोहळा सुरू असताना फटाक्यांच्या स्फोटाने मोठी दुर्घटना घडली. विवाह विधी पार पडल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी केली जात असताना, दारूगोळा असलेला एक मोठा फटाका आकाशात जाण्याऐवजी जमिनीवरच फुटला. या प्रचंड स्फोटात फोटोशूट करणारे दोन तरुण फोटोग्राफर गंभीररीत्या भाजले असून, त्यांचे कॅमेरेही जळून खाक झाले.

या भीषण अपघातात एका फोटोग्राफरचा चेहरा प्रचंड भाजला असून, त्याच्या एका डोळ्याला गंभीर जखम झाली आहे तर दुसऱ्या फोटोग्राफरच्या कानाचा पडदा फाटला आहे. यासोबतच त्यांचे दोन महागडे कॅमेरेही पूर्णपणे खराब झाले आहेत. जखमींना तातडीने बीड येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे.

१ मे रोजी लग्नाची गाठ; पण...
दुर्दैवाची बाब म्हणजे, जखमींपैकी एका फोटोग्राफरचा विवाह १ मे रोजी होणार आहे. ऐन लग्नाच्या तोंडावर ही दुर्घटना घडली. सद्य:स्थितीत त्याच्यावर उपचार सुरू असून, त्याला केवळ लग्नाच्या विधीपुरतेच विवाहस्थळी आणले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

फटाके वाजवावेत की नाही?
फटाके वाजवणे हा आनंदाचा भाग मानला जातो; परंतु बीडमध्ये २८ एप्रिल रोजी लग्नाच्या आतषबाजीदरम्यान झालेली दुर्घटना पाहता, सण किंवा उत्सवाचा आनंद दुसऱ्याच्या जिवावर बेतणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. फटाक्यांमुळे होणारे ध्वनी आणि वायुप्रदूषण तसेच आगीच्या घटना आणि शारीरिक इजा टाळण्यासाठी मर्यादा पाळणे हिताचे ठरते. विशेषतः दाट वस्तीत किंवा गर्दीच्या ठिकाणी फटाके वाजवणे टाळावे.

काय काळजी घ्यायला हवी?
फटाके नेहमी खुल्या मैदानातच वाजवावेत; मंगल कार्यालयासारख्या बंदिस्त किंवा गर्दीच्या ठिकाणी आतषबाजी टाळावी. फटाका जमिनीवर फुटल्यास डोळे, कान आणि चेहऱ्याला गंभीर इजा होऊ शकते. लहान मुलांवर लक्ष ठेवावे आणि सुरक्षेसाठी पाणी, वाळू व प्रथमोपचार पेटी जवळ ठेवावी.

Web Title : बीड शादी में पटाखों का हादसा: दो फोटोग्राफर गंभीर रूप से घायल, उपकरण नष्ट

Web Summary : बीड में एक शादी में पटाखों के विस्फोट में दो फोटोग्राफर गंभीर रूप से घायल हो गए। एक को चेहरे और आंख में गंभीर चोटें आईं, जबकि दूसरे का कान का पर्दा फट गया। महंगा कैमरा उपकरण नष्ट हो गया। एक फोटोग्राफर की आने वाली शादी अब अनिश्चित है।

Web Title : Beed Wedding Fireworks Mishap: Two Photographers Severely Injured, Gear Destroyed

Web Summary : A fireworks explosion at a Beed wedding severely injured two photographers. One suffered serious facial and eye injuries, while the other's eardrum ruptured. Expensive camera equipment was destroyed. One photographer's upcoming wedding is now uncertain.