शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET Exam Paper Leak: 'नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील प्राध्यापक मनीषा मांढरे अटकेत; सीबीआयकडून कारवाई
2
"तो युद्धविराम म्हणजे पाकिस्तानवर उपकार!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' विधानाने जागतिक राजकारणात खळबळ
3
Pakistan Petrol Diesel Price Cut: पाकिस्तानात पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त! एवढ्या रुपयांनी घटले दर; जाणून घ्या इंधनाचे नवे भाव
4
NHAI मध्ये उपव्यवस्थापक पदांची भरती; १ लाख ७७ हजारांपर्यंत पगार; जाणून घ्या पात्रता
5
अरे देवा! साता जन्माची साथ १६ दिवसांत सुटली; नवरी ७२ हजार आणि सोन्याचे दागिने घेऊन पळाली
6
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
7
आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या 'अरबी'ला इंग्रजीत काय म्हणतात? ९०% लोक देतात याचे चुकीचे उत्तर! तुम्हाला माहितीये?
8
गजलक्ष्मी-गजकेसरी योगात अधिक मास २०२६: ९ राशींचे कल्याण-मंगल, पद-पैसा वाढ; महिनाभर अपार लाभ!
9
हा ब्लश नाही, महिलांना होणारा गंभीर आजार आहे; लुपस विकार ज्याने गर्भपातही होऊ शकतो
10
"नकाशावर टिकून राहायचंय की इतिहासात गाडले जायचंय..."; भारतीय लष्करप्रमुखांचा पाकिस्तानला थेट इशारा
11
बालेन शाह सरकारला नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका! पंतप्रधानांनाचा 'तो' मनमानी निर्णय रद्द
12
अंदमानमध्ये फक्त ₹१, तर तेलंगणात ₹३५; पेट्रोल-डिझेलवर कोणत्या राज्यात किती कर लागतो? जाणून घ्या...
13
दरमहा २००० रुपयांच्या गुंतवणूकीवर रिटायरमेंटच्या वेळी मिळतील १.०८ कोटी; व्याजही फिक्स, कोणती आहे स्कीम?
14
बापरे! सुनेला सोन्याचे दागिने देण्यासाठी सासूने ओलांडली मर्यादा; घरमालकाच्या तिजोरीवर मारला डल्ला
15
कल्याणच्या वसार गावात कचरा गाडीच्या खाली सापडून २ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
16
Ola Electric ची मोठी घोषणा; करणार २ हजार कोटींची गुंतवणूक, काय आहे कंपनीचा प्लॅन? 
17
धक्कादायक! पाणीपुरी खाताना सापडला हाडाचा तुकडा; किळसवाणा Video तुफान व्हायरल
18
घर खरेदी करण्यापूर्वी पाहा 'हे' ५ गोल्डन रुल्स, अन्यथा वाढू शकतो कर्जाचा बोजा
19
Swapna Barman : "मी राजकारणात येऊन चूक केली", TMC उमेदवाराच्या घराला आग, काय म्हणाल्या स्वप्ना बर्मन?
20
Ganga Dussehra 2026: १७ मे रोजी अधिक मास आणि गंगा दशहरा उत्सवास प्रारंभ; रामसेतू बांधणीचाही मुहूर्त हाच!
Daily Top 2Weekly Top 5

बीड हादरले! हिंगणी तलावात मासेमारीची होडी पलटून दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू; एक बचावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 15:59 IST

अचानक होडी उलटल्याने तिघीजणी बुडाल्या; काठावरील मुलींच्या आरडाओरड्यानंतर गावकऱ्यांची धाव, पण दोघींचा जीव गेला.

- संतोष स्वामी
दिंद्रुड (जि. बीड):
धारूर तालुक्यातील हिंगणी येथे शनिवारी सकाळी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. मत्स्य व्यवसाय करणाऱ्या परिवारातील पाच मुली तलावावर पोहण्यासाठी गेल्या होत्या, मात्र मासेमारीच्या होडीवर बसने त्यांच्या जिवावर बेतले.  मासे पकडण्याची होडी पलटल्याने दोन मुलींचा पाण्यात बुडून करून अंत झाला. पलक शामराव पारवे (वय १४, रा. हटिंगणी) आणि दिव्या विकास कांबळे (रा. कासारवाडी, ता. परळी) अशी मृत मुलींची नावे आहेत.

असा घडला अपघात:
शनिवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास हिंगणी येथील पारवे कुटुंबातील पलक पारवे, दिव्या कांबळे, मोहिनी पारवे, तन्वी पारवे आणि जानवी पारवे या पाच मुली तलावावर गेल्या होत्या. तिथे मासे पकडण्यासाठी असलेल्या होडीवर पलक, दिव्या आणि मोहिनी या तिघी जणी बसल्या. मात्र, होडी तलावाच्या मधोमध गेल्यानंतर अचानक अनियंत्रित होऊन पलटली.

बचावण्यासाठी धरले अन्...
होडी पलटल्याने तिघीही पाण्यात बुडू लागल्या. मोहिनीला पोहता येत होते, मात्र पाण्यात बुडत असलेल्या पलक आणि दिव्या यांनी घाबरून मोहिनीला घट्ट पकडल्याने तीही बुडू लागली. तलावाच्या काठावर उभ्या असलेल्या इतर मुलींनी हा प्रकार पाहून आरडाओरडा सुरू केला.

गावकऱ्यांची धाव, पण उशीर झाला
मुलींचा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी तातडीने तलावाकडे धाव घेतली आणि तिघींनाही बेशुद्ध अवस्थेत पाण्यातून बाहेर काढले. यातील मोहिनीला तातडीने शुद्ध आली, मात्र पलक आणि दिव्या यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अंबाजोगाई येथील स्वराती (स्वामी रामानंद तीर्थ) रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेमुळे हिंगणी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Beed: Boat capsizes in Hingni Lake, two girls drown.

Web Summary : Tragedy in Beed: Two girls drowned in Hingni Lake after a fishing boat capsized. Three girls were on the boat; one survived. The victims were identified as Palak Parve, 14, and Divya Kamble. Villagers rushed to help, but it was too late.
टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याdrowningपाण्यात बुडणे