ब्लॅकमेलिंगचा भयानक प्रकार! अंगणवाडी मदतनीस महिलेचे आक्षेपार्ह व्हिडीओ काढून वर्षभर शोषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 18:10 IST2026-05-05T18:07:08+5:302026-05-05T18:10:02+5:30

लस्सीतून गुंगीचे औषध अन् विकृत कृत्य; कळंबच्या नराधमाने ३० वर्षीय महिलेला लुटले, युसूफवडगाव पोलिसांत गुन्हा दाखल.

Beed Crime: Anganwadi Helper Raped for a Year in Kaij; Accused Arrested for Blackmailing with Private Videos | ब्लॅकमेलिंगचा भयानक प्रकार! अंगणवाडी मदतनीस महिलेचे आक्षेपार्ह व्हिडीओ काढून वर्षभर शोषण

ब्लॅकमेलिंगचा भयानक प्रकार! अंगणवाडी मदतनीस महिलेचे आक्षेपार्ह व्हिडीओ काढून वर्षभर शोषण

केज (जि. बीड): केज तालुक्यातील एका ग्रामीण भागात अंगणवाडी मदतनीस म्हणून कार्यरत असलेल्या ३० वर्षीय महिलेवर कळंब येथील एका नराधमाने मे २०२५ पासून सातत्याने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी विकास लक्ष्मण खाडे (रा. संभाजीनगर, कळंब) याने पीडितेला लस्सीतून गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले आणि तिचे आक्षेपार्ह फोटो व व्हिडीओ काढले होते.

एक वर्षापासून सुरू होता छळ
पीडित महिलेशी ओळख झाल्यानंतर आरोपीने तिला जाळ्यात ओढले. आक्षेपार्ह व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल करण्याची आणि जीवे मारण्याची धमकी देऊन तो पीडितेवर वारंवार बळजबरी करत होता. मे २०२५ ते २२ एप्रिल २०२६ या कालावधीत त्याने कळंबमधील बालाजी व प्रेरणा लॉज, केजमधील सागर व प्रताप लॉज तसेच पीडितेच्या राहत्या गावी नेऊन अत्याचार केले.

आरोपीला पोलीस कोठडी
पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून युसूफवडगाव पोलीस ठाण्यात विकास लक्ष्मण खाडे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिन्द्रनाथ शेंडगे यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत तपासाला गती दिली. पोलिसांनी आरोपीला त्याच्या राहत्या घरातून अटक केली असून, केज न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भीमराव मांजरे करत आहेत.

Web Title : आंगनवाड़ी सहायिका को ब्लैकमेल कर यौन उत्पीड़न, आरोपी गिरफ्तार।

Web Summary : बीड में एक 30 वर्षीय आंगनवाड़ी सहायिका को विकास खाडे ने ब्लैकमेल कर एक साल तक बार-बार यौन उत्पीड़न किया। खाडे ने उसे नशीली दवा देकर वीडियो बनाया और जारी करने की धमकी दी। पुलिस ने खाडे को गिरफ्तार किया; जांच जारी है।

Web Title : Anganwadi worker blackmailed, sexually assaulted for year; accused arrested.

Web Summary : A 30-year-old Anganwadi worker in Beed was blackmailed and repeatedly sexually assaulted for a year by Vikas Khade, who filmed her after drugging her. Khade threatened to release the videos. Police arrested Khade; investigation ongoing.