शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

'सरेंडर कधी व्हायचं ते आरोपी ठरवतो, पुरावे नष्ट करायला वेळ दिला'; संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केला संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 12:23 IST

वाल्मीक कराड याच्या सरेंडर प्रकरणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी संशय व्यक्त केला.

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सीआयडीने आज मुख्य दोन आरोपींना पुण्यातून अटक केली. ३१ डिसेंबर २०२४ रोजी पुण्यातील सीआयडी कार्यालयात सरेंडर झाला. यावरुन आता आमदार संदीर क्षीरसागर यांनी वेगळाच संशय व्यक्त केला आहे. आरोपी स्वत: कधी सरेंडर व्हायचं हे ठरवतात याचा अर्थ आरोपींना पुरावा नष्ट करायला वेळ दिला जात असल्याचा संशय क्षीरसागर यांनी व्यक्त केला. 

'लोकमत'चं WhatsAppचॅनल फॉलो करा!

आज पत्रकार परिषदेमध्ये आमदार संदीप क्षीरसागर यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील संशयीत आरोपींबाबत संशय व्यक्त केला. तसेच यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी केली. 

सरपंच संतोष देशमुखांचे आणखी दोन मारेकरी सापडले; मुख्य आरोपीला ठोकल्या बेड्या

आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले, लोकांचे एवढे मोर्चे निघत असताना आरोपींना अटक करण्यासाठी २६ दिवस का लागले? या प्रकरणातील बाकीचे आरोपी कमी वयाचे आहेत, यातील मास्टरमाईंड हा वाल्मीक कराड आहे. त्याच्यावरती ३०२ अजूनही का नाही. कुठेतरी धनंजय मुंडे मंत्री असल्यामुळे सरंक्षण मिळत आहे, असा संशय आमदार क्षीरसागर यांनी व्यक्त केला. 

"हत्या घडल्यानंतर २६ दिवसांनी आरोपी एखाद्या पिक्चर स्टाईलसारखं सीआयडी कार्यालयात येतात. आरोपींनी हत्या तशीच गाडीचा पाठलाग करुन हत्या केली. आरोपी सगळ्या घडामोडी पाहतो, सगळ्यांना कधी जमा व्हायचं ते सांगतो. मग धनंजय मुंडे यांची वरिष्ठांची भेट झाल्यानंतर तो एका गाडीमधून येतो. बाकीचे आरोपीही त्यांच्या वेळेप्रमाणे येतात. मला तर वाटत या लोकांना पुरावे नष्ट करण्यासाठी वेळ दिला जात आहे, असा संशय आमदार संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केला. 

'धनंजय मुंडे यांनी राजीमाना दिला पाहिजे'

"या प्रकरणी माझी पहिल्या दिवसापासून सीडीआर तपासण्याची मागणी आहे. ज्यावेळी मोर्चा निघाला त्यावेळी त्यांनी एका हॉस्पीटलमधून डिस्चार्ज घेतला, त्याकाळात त्यांना कोण भेटायला आले होते याचे सीसीटीव्ही फुटेज तपासले पाहिजे. धनंजय मुंडे ज्यावेळी पालकमंत्री होते, त्यावेळी त्यांनी काही अधिकारी होते. या तपासात काही मागेपुढे होतंय. त्यामुळे त्यांनी हा तपास होत नाही तोपर्यंत त्यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशा मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली.  

आणखी दोन मारेकरी सापडले

संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरुवातील चार आरोपींना ताब्यात घेण्यात आलं होतं. आरोपी विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतीक घुले आणि महेश केदार यांचा समावेश होता. तर आरोपी सुदर्शन चंद्रभान घुले , कृष्णा शामराव आंधळे, सुधीर ज्ञानोबा सांगळे हे फरार होते. या आरोपींना पकडण्यासाठी प्रसिद्धीपत्रक जारी करत फरार घोषित करण्यात आलं होतं. त्यानंतर आता सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांना अटक करण्यात आली आहे. तर कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. दोन्ही आरोपींना पुण्यातून अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :walmik karadवाल्मीक कराडbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस