१९ व्या वर्षी कुस्तीचे २०० आखाडे गाजवले! बीडची मल्ल गौरी मुखेकरला व्हायचंय 'महाराष्ट्र केसरी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 16:13 IST2026-05-04T16:11:55+5:302026-05-04T16:13:34+5:30

महिला मल्ल गौरी मुखेकरची 'महाराष्ट्र केसरी' होण्यासाठी यशस्वी वाटचाल.

19-Year-Old Female Wrestler Gauri Mukhekar Dominates 200 Akharas; Aims for Maharashtra Kesari Title | १९ व्या वर्षी कुस्तीचे २०० आखाडे गाजवले! बीडची मल्ल गौरी मुखेकरला व्हायचंय 'महाराष्ट्र केसरी'

१९ व्या वर्षी कुस्तीचे २०० आखाडे गाजवले! बीडची मल्ल गौरी मुखेकरला व्हायचंय 'महाराष्ट्र केसरी'

कडा (ता. आष्टी):कुस्ती हा खेळ आता केवळ पुरुषांपुरता मर्यादित राहिला नसून, महिला मल्लांनीही या मर्दानी खेळात आपली मुसंडी मारली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील करंजी (ता. पाथर्डी) येथील गौरी मुखेकर हे याचे उत्तम उदाहरण आहे. दौलावडगाव येथील कुस्ती आखाड्यात आली असता, गौरीने आपल्या ध्येयाबद्दल आणि प्रवासाबद्दल माहिती दिली.

वडिलांचा वारसा आणि मेहनतीची जोड
गौरीचे वडील नामदेव मुखेकर हे स्वतः जिल्हा पातळीवरील नावाजलेले पहिलवान आहेत. वडिलांचा सराव पाहून गौरीला लहानपणापासूनच कुस्तीचे आकर्षण वाटू लागले. सुरुवातीला वडिलांनीच घरी जोर, बैठका आणि कुस्तीचे डावपेच शिकवले. त्यानंतर नेवासा येथील त्रिमुर्ती संकुल आणि कोल्हापूर येथे तिने कुस्तीचे प्रगत धडे गिरवले. तिला राष्ट्रीय प्रशिक्षक संभाजी निकाळजे यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

दोनशे आखाड्यांचा अनुभव
गौरीने आतापर्यंत बीड, पुणे, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील विविध भागांत सुमारे २०० मैदानी कुस्ती आखाडे गाजवले आहेत. शैक्षणिक काळात तिने ४ वेळा नॅशनल कुस्ती स्पर्धेत सहभाग घेऊन नेत्रदीपक कामगिरी केली आहे. सध्या ती नेवासा येथे महाविद्यालयाच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे.

"मे महिन्यात हरियाणाचे आव्हान"
येत्या मे महिन्यात हरियाणा येथे राष्ट्रीय स्तरावरील कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गौरीची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. "महाराष्ट्र केसरीची गदा खांद्यावर घेऊन उच्च पदस्थ अधिकारी होण्याचे माझे स्वप्न आहे," असे गौरीने लोकमतशी बोलताना सांगितले.

Web Title : बीड की पहलवान गौरी मुखेकर का लक्ष्य: महाराष्ट्र केसरी खिताब

Web Summary : उन्नीस वर्षीय गौरी मुखेकर, बीड की एक पहलवान, ने 200 कुश्ती अखाड़ों पर विजय प्राप्त की है। अपने पिता से प्रेरित और कठोर प्रशिक्षण प्राप्त, वह महाराष्ट्र केसरी खिताब जीतना और राष्ट्रीय स्तर पर प्रतिस्पर्धा करना चाहती है, उच्च पद पर आसीन होने की आकांक्षा के साथ।

Web Title : Beed Wrestler Gauri Mukhekar Aims for Maharashtra Kesari Title

Web Summary : Nineteen-year-old Gauri Mukhekar, a wrestler from Beed, has conquered 200 wrestling arenas. Inspired by her father and trained rigorously, she aims to win the Maharashtra Kesari title and compete nationally, aspiring to a high-ranking position.