Helmet घालताच केस चिकट आणि विस्कळीत होतात? 'या' ५ टिप्सने काही मिनिटात मिळेल फ्रेश लूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 10:48 IST2026-04-18T10:47:20+5:302026-04-18T10:48:29+5:30
Helmet Tricks : हेलमेटने ऑफिसला पोहोचेपर्यंत केस पूर्णपणे विस्कळीत झालेले असतात. जर आपल्याला सुद्धा ही समस्या होत असेल तर आम्ही आपल्याला ५ टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे केस मिनिटांमध्ये फ्रेश दिसू लागतील.

Helmet घालताच केस चिकट आणि विस्कळीत होतात? 'या' ५ टिप्सने काही मिनिटात मिळेल फ्रेश लूक
Helmet Tricks : बाईक चालवताना आजकाल अनेक ठिकाणी हेलमेट घालणं बंधनकारक आहे. आपल्या सुरक्षेसाठी हेलमेट फारच आवश्यक असतं. पण रोज हेलमेट वापरणाऱ्यांना एका कॉमन समस्येचा सामना करावा लागतो. हेलमेटमुळे केस चिकट आणि फ्लॅट होतात. म्हणजे काय तर केसांची स्टाइल बिघडते आणि ते चिकट होतात. ऑफिसला पोहोचेपर्यंत केस पूर्णपणे विस्कळीत झालेले असतात. जर आपल्याला सुद्धा ही समस्या होत असेल तर आम्ही आपल्याला ५ टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे केस मिनिटांमध्ये फ्रेश दिसू लागतील.
ड्राय शाम्पू
जर आपले केसही लवकर तेलकट होत असतील आपण घरातून निघण्याआधी थोडं ड्राय शाम्पू केसांवर लावू शकता. ड्राय शाम्पूने केसांमधील एक्स्ट्रा तेल शोषलं जातं. ज्यामुळे केसांना फ्रेश लूक मिळतो. याने हेलमेट काढल्यावरही केस तेलकट किंवा चिकट होणार नाही.
कॉटन स्कार्फ किंवा दुपट्टा
हेलमेट थेट घालू नका, त्याऐवजी डोक्यावर आधी कॉटनचा दुपट्टा किंवा स्कार्फ बांधावा. असं केल्याने घाम थेट केसांमध्ये जाणार नाही.
हेअर स्टाइल साधी ठेवा
जर आपण हेलमेट वापरत असाल तर हेअर स्टाइल साधी ठेवू शकता. म्हणजे केसांची समस्या होणार नाही. तसेच जास्त लांब केसही ठेवू नका.
कंगवा आणि टिशू
आपल्यासोबत बॅगमध्ये खिशात नेहमी एक छोटा कंगवा आणि टिशू पेपर ठेवा. हेलमेट काढल्यानंतर त्वचेवरील घाम पुसा आणि केस नीट करा.
योग्य हेलमेटची निवड
आपण कशाप्रकारचं हेलमेट वापरत आहात हेही महत्वाचं ठरतं. जास्त टाइट हेलमेट वापरणं टाळावं. टाइट हेलमेटमुळे केस जास्त दाबले जातात. त्यामुळे आपल्या डोक्याच्या आकाराच्या हिशेबाने हेलमेटची निवड करावी.