शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

Breaking : सायना नेहवालचा बहिणीसह भाजपात प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 12:22 PM

Saina Nehwal's Entry in BJP : भारताची फुलराणी सायना नेहवाल आज भारतीय जनता पार्टीची सदस्य होणार आहे.

भारताची फुलराणी सायना नेहवाल आज भारतीय जनता पार्टीची सदस्य होणार आहे. आज त्याची अधिकृत घोषणा होणार असल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे. मागील काही महिन्यांपासून सायनाला आपल्या पक्षात घेण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न सुरू होते आणि अखेरीस त्यांना यश मिळाल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी कुस्तीपटू योगेश्वर दत्त, बबिता फोगाट यांनी हरयाणा विधानसभा आणि क्रिकेटपटू गौतम गंभीर याने भाजपाच्या चिन्हावर लोकसभा निडवणुक लढवली होती. त्यामुळे आगामी निवडणुकीत सायनाही निवडणुकीच्या रिंगणात दिसण्याची शक्यता आहे.

सायनानं आतापर्यंत 24 आंतरराष्ट्रीय जेतेपदं पटकावली आहेत. तिनं तीन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आणि 2012च्या ऑलिम्पिक स्पर्धेत तिनं कांस्यपदक जिंकून इतिहास घडवला. BWFच्या बहुतांश स्पर्धांमध्ये वैयक्तिक पदक जिंकणारी ती एकमेव भारतीय बॅडमिंटनपटू आहे. तिनं BWF वर्ल्ड चॅम्पियनशीप, BWF वर्ल्ड ज्युनियर अजिंक्यपद स्पर्धेत तिच्या नावावर पदकं आहेत. ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणारी ती पहिली भारतीय बॅडमिंटनपटू आहे. शिवाय वर्ल्ड चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या पहिल्या भारतीय बॅडमिंटनपटूचा मानही सायनाच्या नावावर आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत ( 2010 आणि 2018) दोन सुवर्णपदक नावावर असणारी ती पहिलीच भारतीय आहे.  2016मध्ये तिला पद्म भुषण पुरस्कारानं गौरविण्यात आलं. त्यानंतर तिला राजीव गांधी खेल रत्न आणि अर्जुन पुरस्कारही देण्यात आला.

सायनाची पदकं2012 ऑलिम्पिक - कांस्यपदकवर्ल्ड चॅम्पियनशीप - रौप्यपदक ( 2015) आणि कांस्यपदक ( 2017)उबेर चषक - कांस्यपदक ( महिला संघ) 2014 व 2016राष्ट्रकुल स्पर्धा - सुवर्णपदक ( महिला एकेरी) 2010 व 2018; सुवर्णपदक ( मिश्र संघ) 2018, रौप्यपदक ( मिश्र संघ) 2010, कांस्यपदक ( मिश्र संघ) 2006.आशियाई स्पर्धा - कांस्यपदक ( महिला सांघिक 2014 व महिला एकेरी 2018)आशियाई अजिंक्यपद - कांस्यपदक ( 2010, 2016, 2018)वर्ल्ड ज्युनियर अजिंक्यपद - सुवर्णपदक ( 2008), रौप्यपदक ( 2006)राष्ट्रकुल युवा स्पर्धा - सुवर्णपदक ( 2008), रौप्यपदक ( 2004, मिश्र संघ) 

 

टॅग्स :Saina Nehwalसायना नेहवालBJPभाजपा