TVS Orbiter V1: टीव्हीएस ऑर्बिटर व्ही१ इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लॉन्च; किंमत पाहून खूश व्हाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 17:10 IST2026-03-12T17:09:53+5:302026-03-12T17:10:49+5:30
TVS Orbiter V1 Launched: इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमध्ये आपली पकड मजबूत करण्यासाठी टीव्हीएस मोटर कंपनीने आपल्या ऑर्बिटर सीरीजमधील नवीन स्कूटर टीव्हीएस ऑर्बिटर व्ही१ भारतात लॉन्च केली आहे.

TVS Orbiter V1: टीव्हीएस ऑर्बिटर व्ही१ इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लॉन्च; किंमत पाहून खूश व्हाल!
इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमध्ये आपली पकड मजबूत करण्यासाठी टीव्हीएस मोटर कंपनीने आपल्या ऑर्बिटर सीरीजमधील नवीन स्कूटर टीव्हीएस ऑर्बिटर व्ही१ भारतात लॉन्च केली आहे. महत्त्वाचे म्हणजे, ज्यांना बजेटमध्ये स्टायलिश आणि फीचर्सने लोड असलेली इलेक्ट्रिक स्कूटर हवी आहे, त्यांच्यासाठी टीव्हीएस ऑर्बिटर व्ही१ हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. त्यामुळे ही इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात मोठी स्पर्धा निर्माण करू शकते.
टीव्हीएस ऑर्बिटर व्ही१ ची मूळ एक्स-शोरूम किंमत (सबसिडीसह) ₹८४ हजार ५०० आहे. मात्र, जर ग्राहकांनी 'BaaS' मॉडेल निवडले, तर ही स्कूटर त्यांना केवळ ₹४९ हजार ९९९ (एक्स-शोरूम) मध्ये खरेदी करता येईल.'BaaS' मॉडेलमध्ये ग्राहक केवळ स्कूटरची किंमत देतात आणि बॅटरीसाठी मासिक सबस्क्रिप्शन घेतात. टीव्हीएस ऑर्बिटर व्ही१ साठी दरमहा ₹८६२ सबस्क्रिप्शन शुल्क आकारले जाते. कंपनीने या सबस्क्रिप्शनमध्ये किलोमीटरची कोणतीही किमान मर्यादा ठेवलेली नाही, ज्यामुळे ग्राहक कितीही प्रवास करू शकतात. याव्यतिरिक्त, ऑर्बिटर व्ही २ व्हेरिएंट देखील BaaS अंतर्गत ₹५९ हजार ६६४ मध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे.
कमी किंमत असूनही कंपनीने परफॉर्मन्समध्ये कोणतीही तडजोड केलेली नाही. ऑर्बिटर व्ही१ मध्ये १८ kWh बॅटरी पॅक मिळतो. ही स्कूटर एकदा चार्ज केल्यानंतर ८६ किलोमीटरपर्यंत धावू शकते. फास्ट चार्जिंगच्या मदतीने या स्कूटरची बॅटरी केवळ २ तास २० मिनिटांत ८० टक्के चार्ज होते. शिवाय, यात इको आणि पॉवर असे दोन मोड्स देण्यात आले आहेत.
टीव्हीएस ऑर्बिटर व्ही१ मध्ये प्रीमियम मॉडेलप्रमाणेच आधुनिक फीचर्स-
सेफ्टी अँड कंट्रोल: हिल होल्ड असिस्ट, क्रूझ कंट्रोल आणि पार्किंग असिस्ट.
टेक्नोलॉजी: रिजनरेटिव्ह ब्रेकिंग, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, नेव्हिगेशन आणि कलर एलसीडी क्लस्टर.
डिझाइन: पूर्ण एलईडी लाइटिंग आणि दोन आकर्षक रंग - मार्टेन कॉपर आणि स्टेलर सिल्व्हर.