Tata Punch EV Facelift Launched: टाटा पंच ईव्ही फेसलिफ्ट भारतात लॉन्च; एका चार्जवर ४६८ किलोमीटर धावणार, किंमत किती? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 13:58 IST2026-02-20T13:57:05+5:302026-02-20T13:58:56+5:30

Tata Punch EV Facelift Launched: इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा मोटर्सने आज आपली सर्वाधिक लोकप्रिय इलेक्ट्रिक एसयूव्ही टाटा पंच ईव्हीचे नवीन फेसलिफ्ट मॉडेल भारतात लॉन्च केले आहे.

Tata Motors Launches New Punch EV Facelift; Prices Start at ₹6.49 Lakh with Battery-as-a-Service Baas Model | Tata Punch EV Facelift Launched: टाटा पंच ईव्ही फेसलिफ्ट भारतात लॉन्च; एका चार्जवर ४६८ किलोमीटर धावणार, किंमत किती? 

Tata Punch EV Facelift Launched: टाटा पंच ईव्ही फेसलिफ्ट भारतात लॉन्च; एका चार्जवर ४६८ किलोमीटर धावणार, किंमत किती? 

इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा मोटर्सने आज आपली सर्वाधिक लोकप्रिय इलेक्ट्रिक एसयूव्ही टाटा पंच ईव्हीचे नवीन फेसलिफ्ट मॉडेल भारतात लॉन्च केले आहे. आकर्षक लूक, हाय-टेक फीचर्स आणि शक्तिशाली बॅटरी पॅकसह ही कार आता अधिक परवडणाऱ्या दरात उपलब्ध झाली आहे. कंपनीने आजपासूनच या नवीन फेसलिफ्ट मॉडेलसाठी अधिकृत बुकिंग सुरू केली आहे. लवकरच देशभरातील शोरूम्समध्ये या कारची डिलिव्हरी सुरू केली जाईल. कमी किंमत आणि दमदार रेंजमुळे ही कार मध्यमवर्गीय भारतीय कुटुंबांसाठी एक उत्तम पर्याय ठरणार आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

टाटा मोटर्सने आपल्या नवीन पंच ईव्ही फेसलिफ्टद्वारे इलेक्ट्रिक कारच्या बाजारपेठेत तंत्रज्ञान आणि सुरक्षिततेचा नवा स्तर गाठला आहे. केवळ किंमतच नाही, तर कारची आतील डिझाइन आणि प्रवाशांची सुरक्षा यावर कंपनीने विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

नवीन पंच ईव्हीचे इंटरिअर पूर्णपणे बदलण्यात आले. हलक्या रंगांचा ड्युअल-टोन डॅशबोर्ड आणि प्रीमियम लेदरेट अपहोल्स्ट्रीमुळे कारला लक्झरी लूक मिळाला आहे. कारमध्ये १०-इंच मोठी इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस अ‍ॅपल कारप्ले, अँड्रॉइड ऑटो आणि व्हॉइस असिस्टंट मिळत आहे. उन्हाळ्याचा विचार करून यात व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि वस्तू थंड ठेवण्यासाठी कूल्ड ग्लोव्हबॉक्स देण्यात आला आहे.

टाटा मोटर्सने सुरक्षिततेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केलेली नाही. आता पंच ईव्हीच्या सर्व मॉडेल्समध्ये ६ एअरबॅग्ज मिळतील. सुरक्षेसाठी ३६०-डिग्री कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम, हिल होल्ड असिस्ट आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम यांसारखी महत्त्वाची फीचर्स जोडली आहेत. या कारमध्ये ग्राहकांना फियरलेस यलो, बंगाल रूज आणि कॅरमेल असे तीन नवीन रंग उपलब्ध करून देण्यात आले आहेत.  

ग्राहकांचा रेंज अँक्झायटी दूर करण्यासाठी टाटा मोटर्सने मोठे पाऊल उचलले आहे. कंपनीने देशभरात १३० मेगा-चार्जिंग हब सुरू केले असून ही संख्या पुढील काही महिन्यात ८०० पर्यंत नेण्याची उद्दिष्ट आहे. यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान चार्जिंग करणे सोपे होणार आहे.  या इलेक्ट्रिक एसयूव्हीची सुरुवातीची किंमत ₹९.६९ लाख रुपये आहे. तर ग्राहक बॅटरी रेंटल पर्याय निवडत असेल त्याला ही कार ६.४९ लाख रुपयांत खरेदी करता येऊ शकते.

Web Title : टाटा पंच ईवी फेसलिफ्ट भारत में लॉन्च: रेंज, कीमत विवरण

Web Summary : टाटा मोटर्स ने पंच ईवी फेसलिफ्ट को बेहतर फीचर्स और 468 किमी रेंज के साथ लॉन्च किया। बुकिंग खुली; डिलीवरी जल्द ही। इसमें बेहतर इंटीरियर, छह एयरबैग जैसी सुरक्षा सुविधाएँ और ₹9.69 लाख की शुरुआती कीमत है।

Web Title : Tata Punch EV Facelift Launched in India: Range, Price Details

Web Summary : Tata Motors launched the Punch EV facelift with enhanced features and a 468km range. Bookings are open; deliveries soon. It boasts improved interiors, safety features like six airbags, and a starting price of ₹9.69 lakh.