मर्सिडीजने भारतात लॉन्च केली EV सेडान; 792 KM रेंजसह मिळतात दमदार फीचर्स, किंमत...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 17:48 IST2026-02-25T17:48:40+5:302026-02-25T17:48:53+5:30
येत्या 10 मार्च 2026 पासून प्री-बुकिंग सुरू!

मर्सिडीजने भारतात लॉन्च केली EV सेडान; 792 KM रेंजसह मिळतात दमदार फीचर्स, किंमत...
लक्झरी कार उत्पादक मर्सिडीज-बेंझने भारतात आपली नवी CLA इलेक्ट्रिक सेडान आणली आहे. ही कार सर्वाधिक रेंज, 800V इलेक्ट्रिक आर्किटेक्चर आणि अल्ट्रा-फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. या CLA इलेक्ट्रिकची प्री-बुकिंग 10 मार्च 2026 पासून सुरू होणार असून, एप्रिल 2026 मध्ये अधिकृत लॉन्च अपेक्षित आहे. या कारची किंमत जाहीर करण्यात आलेली नसली तरी, एक्स-शोरूम किंमत 55 ते 60 लाख रुपये दरम्यान असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बॅटरी आणि परफॉर्मन्स
नवी CLA इलेक्ट्रिक Mercedes-Benz च्या MMA (Modular Mercedes Architecture) प्लॅटफॉर्मवर आधारित आहे.
बॅटरी : 85kWh
इलेक्ट्रिक मोटर : रिअर-माउंटेड, 268 bhp पॉवर
रेंज : एका फुल चार्जमध्ये 792 किमी (कंपनीचा दावा)
0-100 किमी/ता. : 6.7 सेकंद
ट्रान्समिशन : 2-स्पीड
फास्ट चार्जिंग : 240kW DC
चार्जिंग वेळ : फक्त 20 मिनिटांत 400 किमी रेंज (कंपनीचा दावा)
साइज आणि डिझाइन
लांबी : 4,723 मिमी
रुंदी : 1,855 मिमी
उंची : 1,468 मिमी
व्हीलबेस : 2,790 मिमी
बूट स्पेस : 405 लिटर
फ्रंक (समोरचा बूट) : 101 लिटर
डिझाइन हायलाइट्स
फ्रंट ग्रिलवर 142 चमकते स्टार एलिमेंट्स
स्टार-शेप LED DRL
ट्विन-पॉड हेडलॅम्प
18-इंच अलॉय व्हील्स
फ्लश डोअर हँडल्स
कनेक्टेड LED टेललॅम्प
ही कार Polar White, Cosmic Black, Alpine Grey, Clear Blue आणि Patagonia Red या पाच रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे.
फीचर्स आणि टेक्नॉलॉजी
14-इंच टचस्क्रीन (नव्या MB OS सह)
10.25-इंच ड्रायव्हर डिस्प्ले
6 x 100W USB-C फास्ट चार्जिंग पोर्ट्स
वायरलेस चार्जिंग
OTA अपडेट्स
पॅनोरॅमिक सनरूफ
ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल
लेव्हल-2 ADAS (कॅमेरा व रडार आधारित सुरक्षा प्रणाली)