Asian Games 2018 : भारताला महिला रिलेमध्ये सुवर्णपदक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 19:00 IST2018-08-30T18:59:16+5:302018-08-30T19:00:13+5:30

Asian Games 2018 Day 12 Highlight: भारताच्या महिला रिले संघाने सुवर्णपदकाची कमाई केली.

Asian Games 2018: India Gold Medal in Women's Relay | Asian Games 2018 : भारताला महिला रिलेमध्ये सुवर्णपदक

Asian Games 2018 : भारताला महिला रिलेमध्ये सुवर्णपदक

ठळक मुद्दे4 बाय 400 मी. हे अंतर भारताने 3:28.72 मिनिटांमध्ये पूर्ण केले आणि सुवर्णपदकाला गवसणी घातली.

जकार्ता, आशियाई क्रीडा स्पर्धा : भारताच्या महिला रिले संघाने सुवर्णपदकाची कमाई केली. अॅथलेटीक्समधील 4 बाय 400 रिले या प्रकारात भारताच्या महिलांनी दमदार कामगिरी केली. 4 बाय 400 मी. हे अंतर भारताने 3:28.72 मिनिटांमध्ये पूर्ण केले आणि सुवर्णपदकाला गवसणी घातली.


भारताच्या सुवर्णपदक विजेत्या संघामध्ये हिमा दास, पुवम्मा राजू माचेतिरा, सरिताबेन लक्ष्मीबाई गायकवाड आणि विसमाया वेलुवा कोरोथ यांचा समावेश होता. यापूर्वी या आशियाई स्पर्धेत हिमाने दोन रौप्यपदक पटकावले होते, त्यामुळे या स्पर्धेतील हिमाचे हे एकूण तिसरे पदक आहे.

Web Title: Asian Games 2018: India Gold Medal in Women's Relay