शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळच्या CM पदासाठी गांधी कुटुंबाचा 'खास' माणूस?, ६३ पैकी ४७ आमदारांची पसंती, लवकरच निर्णय होणार
2
Hantavirus: चिंताजनक! १२ देशांमध्ये हंता व्हायरस पसरण्याचा धोका; WHO ने जारी केला रेड अलर्ट, जगासमोर आव्हान
3
रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... 
4
Top Marathi News LIVE Updates: थोड्याच वेळात दहावीचा निकाल, टक्का वाढणार की घसरणार?
5
HDFC Bankच्या ५५ महिन्यांच्या FD योजनेत ₹५५,००० गुंतवल्यास किती मिळेल परतावा? जाणून घ्या सविस्तर गणित
6
TCS प्रकरणातील आरोपी निदा खानचा अटकेनंतर पहिला फोटो समोर; ४ नातेवाईकांसोबत फ्लॅटवर राहत होती...
7
बंगळुरूच्या जोडप्यानं श्रीलंकेहून पोहत गाठला भारत; १० तास ४५ मिनिटांत ३२ किलोमीटर अंतर कापलं
8
Viral Video: रस्त्याच्या कडेला पडलेल्या होत्या तीन बॅगा, आतमध्ये मिळाले २ कोटी ८३ लाख, पण...
9
Stock Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २१३ आणि निफ्टी ९३ अंकांच्या घसरणीसह खुला
10
Chanakya Niti: गर्दीत तुमची 'छाप' पाडायचीय? मग चाणक्य नीतीचे हे १० नियम कधीच विसरू नका!
11
Maharashtra SSC Result 2026: आज दहावीचा निकाल कसा अन् कुठे पाहणार?; 'अशी' सोपी ट्रिक फॉलो करा
12
टी-२० संघातून सूर्यकुमार यादवचा पत्ता कट, 'हा' खेळाडू बनणार नवा कर्णधार?; BCCI करतंय विचार
13
चार कागदपत्रे नसतील तर महाराष्ट्रात राहता येणार नाही; व्हायरल पोस्टनंतर सरकारने सांगितलं सत्य 
14
MS Dhoni: बिहार- झारखंडमध्ये २० हजार कोटी रुपयांची करवसुली; धोनी ठरला सर्वाधिक कर भरणारा व्यक्ती
15
'उरी' फेम रिवा अरोरासोबत डिलिव्हरी बॉयचं गैरवर्तन, शिवीगाळही केली; म्हणाली- "जेव्हा तो सामान घेऊन आला..."
16
ज्या सरकारी बँकेत ₹६५ साठी केलेलं साफसफाईचं काम आज त्याच बँकेत बनल्या AGM; कोण आहेत प्रतीक्षा तोंडवलकर?
17
'धुरंधर २' च्या OTT रिलीजची तारीख कन्फर्म? कोर्टातील सुनावणीवेळी निर्मात्यांनी केला खुलासा
18
कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय?
19
Nashik TCS Case: निदा खान कुठं अन् कुणासोबत होती? पोलिसांनी तिला कसं शोधलं? जाणून घ्या A टू Z माहिती
20
Robot World Record : माणसालाही हरवलं! रोबोटनं धावण्याच्या शर्यतीत मोडला जागतिक विक्रम; पाहा थरारक वेग
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक बँकेच्या सभासदांना मिळणार ७ टक्के लाभांश

By admin | Updated: September 12, 2016 00:11 IST

दि. अमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेच्या सभासदांना ७ टक्के लाभांश देण्याचा निर्णय...

आमसेभत निर्णय : हजारो सभासदांना होणार लाभ
अमरावती : दि. अमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेच्या सभासदांना ७ टक्के लाभांश देण्याचा निर्णय रविवार ११ सप्टेंबर रोजी अहिल्या मंगल कार्यालयात पार पडलेल्या वार्षिक आमसभेत सर्वानुमताने घेण्यात आला. या निर्णयाचा लाभ शिक्षक बँकेच्या हजारो सभासदांना मिळणार आहे.
शिक्षकांची जिव्हाळ्याची बँक म्हणून ओळखली जाणारी दि अमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेची वार्षिक आमसभा रविवार बँकेचे अध्यक्ष गोकुल राऊत व संचालकांचे उपस्थितीत पार पडली. यावेळी संचालक मंडळाच्यावतीने बँकेच्या आगामी प्रगतीसाठी नवीन ध्येयधोरणे मांडलेत. शिवाय यासभेत ३१ मार्च १६ पर्यंतच्या आर्थिक वर्षाचा अहवाल, हिशेबांची पत्रके, अंदाज पत्रक, नफा वाटणीला सभासदांची मंजुरी घेणे आदी विषयांवर सभेत चर्चा करण्यात आली. याशिवाय बँकेचे मय्यत सभासदांच्या कल्याण निधीत शिक्षक बँकेने भरघोस वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता मय्यत सभासदांच्या कुटूंबियांना १० लाख रूपयांचा मदत निधी दिला जाणार आहे. यापूर्वी मय्यत कल्याण निधीतून ४ लाख रूपये मदत केली जात होती. मात्र यात बदल केल्याने त्यांना आता १० लाखांची मदत दिली जाईल. यासाठी दरमहा २५० रूपये वर्गणी द्यावी लागणार आहे. यासोबतच बँकेची मुख्य कार्यालयाची इमारत जीर्ण झाल्याने नवीन प्रशासकीय इमारत बांधण्याचा निर्णय सभेत झाला. बँकेमार्फत सुकन्या योजना राबविण्यासाठी मुलीचे वय ३ महिने ते १० वर्षांपर्यंत राहील. १८ व्या वर्षी ५० टक्के, तर २० व्या वर्षी पूर्ण रक्कम मिळणार असून यासाठी ९.५० व्याजाचा लाभ मिळणार आहे.
बँकेत आगामी काळात १४५ कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार असून याबाबतच्या ठरावालाही मान्यता देण्यात आली. चर्चेत सुनील कुकडे, सुरेंद्र मेटे, नयन काळबांडे व अन्य सभासदांनी प्रश्न मांडलेत. व्याजदरात १ टक्का कमी करण्याची मागणी कुकडे व सदस्यांनी केली. सभेला अध्यक्ष गोकुल राऊत, उपाध्यक्ष सुनील केने, संचालक संजय भेले, किरण पाटील, प्रफुल्ल शेंन्डे, अ.राजिक हूसेन, ज्ञानेश्र्वर घाटे, प्रमोद ठाकरे, राजेंद्र गावंडे, मनोज ओंळबे, विजय पुसरलेकर, उमेश गोदे, नीळकंठ यावले, अजयानंद पवार, शैलेश चौकसे, छोटूसिंग सोमवंशी, सुदाम राठोड, मधुकर चव्हाण, रवींद्र निघोंट, सुनीता लहाने, अर्चना सावरकर, सरव्यवस्थापक राजेश देशमुख आदी उपस्थित होते. अध्यक्ष गोकुल राऊत यांनी यावेळी मार्गदर्शन करतांना बॅकेत नवीन बदल होत असल्याने काही धोरण संचालक मंडळाच्या समन्वयातून महत्त्वाचे निर्णय आमसभेत सभासदा समोर मांडल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमसभेला जिल्हा भरातील शिक्षक बँकेचे सभासद मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)