शहरं
Join us  
Trending Stories
1
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
2
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
3
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
4
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
5
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
6
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
7
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
8
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
9
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
10
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
11
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
12
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
13
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
14
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
15
मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच, पण डझनभर गाड्यांचा ताफा...; जयंत पाटील यांची टिप्पणी
16
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
17
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
18
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
20
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींच्या घराभोवती बहरणार परसबाग

By admin | Updated: January 7, 2015 22:44 IST

दुर्गम भागातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने व आदिवासी बांधवांना पौष्टीक आहार पुरविण्यासाठी मेळघाटातील आदिवासींच्या घराभोवती असलेल्या परसबागेत आता भाजीपाला व फळांची

जितेंद्र दखने - अमरावती
दुर्गम भागातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने व आदिवासी बांधवांना पौष्टीक आहार पुरविण्यासाठी मेळघाटातील आदिवासींच्या घराभोवती असलेल्या परसबागेत आता भाजीपाला व फळांची लागवड करण्याची योजना राबविण्यासाठी शासनाने ५ जानेवारी रोजी हिरवी झेंडी दिली आहे.
मेळघाटसह आदिवासीबहुल भागात कुपोषणाचे प्रमाण प्रचंड आहे. आदिवासी कुटुंबांच्या घराभोवती असलेल्या परसरबागेत पौष्टीक भाजीपाला व फळांची लागवड केल्यास आदिवासींना सकस आहार मिळू शकतो. त्यामुळे या भाजीपाला व फळांची लागवड करण्यासाठी आदिवासींना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने धारणी व चिखलदरा तालुक्यातील परसबागांची योजना सन २००३-०४ पासून राबविण्यात येत आहे. आदिवासींच्या आहारात जीवनसत्व व इतर आवश्यक पोषक द्रव्ये समाविष्ट करण्याच्या उद्देशाने ही पौष्टीक आहार योजना शासनाने अंमलात आणली आहे.
योजना राबविण्याकरिता लागवडीचे उद्दीष्ट, लाभार्थी निवड, लावावयाची फळझाडे, भाजीपाला, लाभ द्यावयाचे साहित्य व सामुग्री पुरवठा, अंमलबजावणी करणारी यंत्रणा, लाभार्थी प्रशिक्षण, सहनियंत्रण आढावा व मूल्यमापन आणि योजनेंतर्गत तपासणीचे निकष यासाठी शासनाने धोरण ठरवून दिले आहे.
या योजनेला राज्य शासनाने सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात दहा लक्ष रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. त्यामुळे ही योजना अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर व इतर आदिवासीबहूल जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. यामुळे मेळघाटातील वर्षानुुवर्षे गाजत असलेल्या कुपोषणाच्या समस्येला काही प्रमाणात तरी आळा बसू शकतो. कुपोषित मातांना भरपूर व सकस आहार मिळाल्यास त्यांचे आरोग्य संवर्धन शक्य असल्याचा विश्वास वर्तविला जात आहे.