शहरं
Join us  
Trending Stories
1
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
2
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
3
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
4
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
5
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिक्कीमच्या तरूणांसोबत खेळला फुटबॉल, PHOTOSची रंगली चर्चा
6
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
7
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
8
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
9
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
10
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
11
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
12
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
13
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
14
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
15
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
16
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
17
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
18
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
19
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
20
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नोटिशीच्या आडून अधिकाऱ्यांची चांदी

By admin | Updated: August 15, 2016 00:02 IST

अनधिकृत बांधकाम पाडण्याची नोटीस देऊन काही अधिकाऱ्यांनी नाक दाबून तोंड उघडण्याची व्यूव्हरचना आखल्याचा आरोप खुलेआम होत आहे.

अनधिकृत बांधकाम : महापालिकेचा हातोडा हवाचअमरावती : अनधिकृत बांधकाम पाडण्याची नोटीस देऊन काही अधिकाऱ्यांनी नाक दाबून तोंड उघडण्याची व्यूव्हरचना आखल्याचा आरोप खुलेआम होत आहे. या नोटिसींच्या आडून स्वत:चे उखळ पांढरे करून घेण्याचा काहींचा हा प्रताप असल्याचे महापालिका वर्तुळात बोलले जात आहे. स्लॅक सिझन भरून काढण्यासाठी मुद्दामहून काहींना नोटीस पाठविण्याचा रतीब घातला जात आहे. या पार्श्वभूमीवर स्वार्थ बाजुला ठेवून अधिकाऱ्यांनी अनधिकृत बांधकामावर गजराज फिरवावा, अशी सर्वसामान्याची अपेक्षा आहे.यंत्रणेतील लालफितशाहीचे चटके सर्वसामान्यांना सहन करावे लागतात. मात्र मुठभर श्रीमंत पैशाच्या जोरावर त्यांना हवे ते करवून घेतात. नियम सर्वांसाठी समान आहे. निव्वळ पैशाच्या भरवशावर कायदे वाकवले जातात. बहुतांश प्रकरणात अर्थकारणाचे गणित बिघडले की कायद्याचा बडगा उगारला जातो. थेट १५ दिवसांची मुदत दिली जाते. तुम्ही पाडा अन्यथा आम्ही पाडू,अशी नोटीस वजा धमकी दिली जाते. मग सुरु होतो अ‍ॅडजेस्टमेंटचा खेळ. बांधकाम अनधिकृत ठरवून ते १५ दिवसांत पाडण्याचा इशारा दिला जातो. एखादे अनधिकृत बांधकाम अधिकृत करण्याचे कायदेशिर पर्याय असताना मग थेट पाडापाडीच्या नोटीसीचा आधार का घेतला जातो,हे न समजण्या इतपत जनता दुधखुळी नाही.शिवसेनेशी दीर्घकाळापासून जुळलेल्या एका स्थानिक नेत्याला गुडेवारांनी नियमांच्या चौकटीत बसून बांधकामाला परवानगी दिली. त्या प्रकरणात कुणाचीही डाळ शिजू शकली नाही. मात्र गुडेवारांची बदली झाल्याबरोबर महापालिकेतील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने त्या नेत्याकडे मोठ्या रकमेची मागणी केली. त्या नेत्याने भीक घातली नाही हा भाग अलहिदा.मात्र बांधकाम परवानगी देताना जाणूनबूजून उशीर केला जातो, हे वास्तव आहे.किती इमारती पाडल्यातअलीकडच्या काळात अनेक इमारतींचे बांधकाम अनधिकृत आणि अवैधरीत्या करण्यात आल्याचे पालिकेकडून सांगण्यात येते. मात्र नमुना येथील एक इमारत वगळता कुठल्याही अवैध बांधकामावर हातोडा फिरविण्यात आला नाही. जर एखादे अनधिकृत बांधकाम दंड भरून वैध होत असेल, टीडीआर घेऊन रेग्युलाइज्ड होत असेल तर थेट पाडापाडीच्या नोटीसबद्दल उगाचच संशयकल्लोळ निर्माण होतो. फाईलवर वजन ठेवल्याशिवाय ती पुढे सरकत नसल्याचे वास्तव आहे.पवार साहेब,गजराज फिरवाचतत्कालीन आयुक्त गुडेवारांनतर हेमंत पवार यांनी पदाची सूत्रे हाती घेतली. महिना महिन्यांत त्यांनी अतिक्रमण, हॉकर्स झोन, स्मार्टसिटी, डीसीपीएसमधील घोळ असे अनेक मुद्दे लिलया पेलले. या काळात त्यांनी पी फॉर पॉझिटिव्ह, असा बाणा दाखवला. अतिक्रमण निर्मूलन मोहीम व त्या अनुषंगाने उदभवलेल्या प्रश्नावरून त्यांच्यावर प्रेशर बिल्ट अप करण्यात आले. मात्र दबावाला बळी न पडता त्यांनी ठाम भूमिका घेतली. अनधिकृत आणि अवैध बांधकामाबाबतही त्यांनी गजराज फिरविण्याचे आदेश द्यावेत, जेण्ोकरुन अन्य कुणी अवैध बांधकाम करण्यास धजावणार नाही.