शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
3
Top Marathi News LIVE Updates: रिक्षा-टॅक्सी चालकांच्या 'मराठी सक्ती'ला मुदतवाढ?, १ मेचा मुहूर्त टळण्याची शक्यता
4
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
5
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
6
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
7
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
9
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
10
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
11
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
12
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
13
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
14
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
15
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
16
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
17
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
18
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
19
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
20
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘नो पेन्डंसी’ला ‘अकाऊंट’चा हरताळ

By admin | Updated: April 11, 2017 00:29 IST

आयुक्त हेमंत पवार यांच्या ‘मिशन तो पेन्डन्सी’ला लेखा विभागाने हरताळ फासला आहे.

त्रुट्यांची पळवाट : फाईलचा प्रवास अडखळतअमरावती : आयुक्त हेमंत पवार यांच्या ‘मिशन तो पेन्डन्सी’ला लेखा विभागाने हरताळ फासला आहे. फाईल निकाली काढण्याबाबतचे आदेश जाणूनही आपल्याला लागूच नसावेत, अशा आविर्भावात लेखा विभागात फाईल्सचा प्रवास अडखळला आहे. प्रसंगी त्रुट्यांची पळवाट शोधत का होईना फाईल्सला लेखा विभागातून बाहेर पडायला महिन्याचा कालावधी लागतो. तब्बल महिने दीड महिने लेखा विभागात संबंधित फाईल्सवर किती उपचार केले जात असतील, हा संशोधनाचा विषय ठरला आहे. आर्थिक व्यवहाराशी निगडित असलेला लेखाविभाग मागील काही काळांपसून बदनामीच्या दृष्टचक्रात अडकला आहे. ते दुष्टचक्र ‘प्रवाहाच्या उलट’ दिशेने न जाण्याचा सल्ला मिळत असल्याने हा विभाग प्रचंड चर्चेत असतो. महिना महिनाभर येऊन फाईल्स बाहेर पडत नसल्याने आयुक्तांनी फाईल्स संदर्भात काढलेले कार्यालयीन परिपत्रक या विभागाला लागू पडत नसावे, अशी परिस्थिती उद्भवली आहे. कॅफोंनी मासिक ताळेबंदाला खो दिल्याने धनादश पडून राहायल्याचे निरीक्षण अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे यांनी नोंदविले होते. याशिवाय १ मार्च २०१७ पासून महापालिकेतील संपूर्ण व्यवहार कॅशलेस करण्याच्या दृष्टीने आरटीजीएस प्रणाली अवलंबवावी, अशा सूचना होत्या. तथापि लेखा विभागात या आघाडीवर सामसूम आहे. शासकीय कर्मचाऱ्यांकडून शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबाबाबत आणि कर्तव्य कसुरीबाबत शिस्तभंग कारवाई करण्याबाबत १८ नोव्हेंबर २०१७ ला आयुक्तांनी परिपत्रक काढले होते. साधारणपणे कोणतीही फाईल विभागातील किंवा कार्यालयातील कोणत्याही कर्मचाऱ्याच्या टेबलवर सात कामाच्या दिवसाचे वा अधिक काळ प्रलंबित राहणार नाही. तत्काळ आणि तातडीच्या स्वरुपाचे फाईली त्या प्रकरणाच्या निवडीनुसार शक्य तितक्या एका दिवसात किंवा दुसऱ्या दिवशी आणि तातडीचे शक्यतो चार दिवसात निकालात निघावी, असे यात म्हटले होते. मात्र हे परिपत्रक लेखाविभागात पोहोचले नसावे की काय, अशी शंका येण्याइतपत येथे फाईलचा प्रवास रखडत रखडत सुरू आहे. (प्रतिनिधी)म्हणूनच रखडतात फाईल्स लेखा विभागामध्ये देयके सादर करताना विशिष्ट फाईल्सवर जाणून-बुजून त्रुट्या काढल्या जातात. अनेक फाईल्स अडकविल्या जात असल्याचा आरोप लेखा विभागावर होत आहे. त्यात किती तथ्य आहे हा संशोधनाचा विषय असला तरी फाईल्सचा प्रवास लांबविण्यासाठी ही पळवाट शोधली जात असल्याचे महापालिका वर्तुळात बोलले जात आहे.