शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नवीन शैक्षणिक धोरण गरीब विद्यार्थ्यांना मारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 05:01 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : शिक्षण हा केंद्र व राज्य या दोहोंच्या अधिकारातील प्रश्न असताना राज्यांना विश्वासात घेण्यात आले ...

ठळक मुद्देहर्षवर्धन देशमुख, शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांची जयंती उत्साहात, शिव परिवारातील सदस्यांची घरूनच आदरांजली

 लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शिक्षण हा केंद्र व राज्य या दोहोंच्या अधिकारातील प्रश्न असताना राज्यांना विश्वासात घेण्यात आले नाही. नवीन शैक्षणिक धोरण हे गरिबांवरील फार मोठे संकट असून, या धोरणाशी राज्याने शंभर टक्के सहमत होऊ नये, असे आवाहन  श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी केले.
शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या १२२ व्या जयंती उत्सवानिमित्त श्री शिवाजी शिक्षणतर्फे आयोजित कार्यक्रमात हर्षवर्धन देशमुख बोलत होते. संस्थेच्या मुख्य कार्यालयातील सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला उपाध्यक्ष गजानन पुंडकर, कोषाध्यक्ष दिलीप इंगोले, कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ, केशवराव मेतकर, प्राचार्य केशवराव गावंडे, माजी न्यायाधीश अशोक ठुसे, सचिव शेषराव खाडे, स्वीकृत सदस्य प्राचार्य वि.गो. ठाकरे, नरेशचंद्र पाटील, अमोल महल्ले प्रामुख्याने उपस्थित होते. संस्थेचे ज्येष्ठ उपाध्यक्ष नरेशचंद्र ठाकरे व रामचंद्र शेळके हे युट्यूब वाहिनीच्या माध्यमाने या कार्यक्रमात सहभागी झाले. 
कार्यक्रमाचे संचालन मंदा नांदूरकर यांनी केले. संस्थेचे सचिव शेषराव खाडे आणि अधीक्षक दिनेश बागल यांनी पाहुण्यांचे स्वागत केले, सचिव शेषराव खाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी संस्थेचे आजीव सदस्य अशोक देशमुख, प्रभाकर फुसे, वीर उत्तमराव मोहिते यांच्या कन्या भाग्यरेखा देशमुख, प्राचार्य संयोगिता देशमुख, प्राचार्य शशांक देशमुख, कुमार बोबडे, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
रविवारी सकाळी ८ पासून डॉ. पंजाबराव देशमुख स्मृतिस्थळी भाऊसाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादनाची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करण्यात आले. शिव परिवाराच्या सदस्यांनी घरूनच भाऊसाहेबांना आदरांजली वाहिली. 

 

टॅग्स :Educationशिक्षण