शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

परिवहन समितीवरुन महापौर ‘टार्गेट’

By admin | Updated: January 20, 2015 22:28 IST

महापौर चरणजितकौर नंदा यांनी परिवहन समितीत सदस्य नियुक्तीचा विषय स्थगित ठेवण्याचा निर्णय घेताच विरोधी पक्षासह सुनील काळे गटातील सदस्य आक्रमक झाले.

गटनेतेपदाचा वाद : विरोधी पक्ष आणि राष्ट्रवादी गटाचे सदस्य एकवटलेअमरावती : महापौर चरणजितकौर नंदा यांनी परिवहन समितीत सदस्य नियुक्तीचा विषय स्थगित ठेवण्याचा निर्णय घेताच विरोधी पक्षासह सुनील काळे गटातील सदस्य आक्रमक झाले. महापौरांच्या या निर्णया विरोधात एल्गार पुकारत जोरदार विरोध केला. सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, असा शब्दप्रयोग करुन महापौरांना ‘टार्गेट’ करण्याचा प्रयत्न देखील झाला. अखेर पक्षनेता बबलू शेखावत यांनी हस्तक्षेप करीत येत्या सर्वसाधारण सभेत परिवहन व स्थायी समितीत सदस्यांची नियुक्ती केली जाईल, असे आश्वासन देताच वादावर पडदा पडला.महापालिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात मंगळवारी महापौर चरणजितकौर नंदा यांच्या पीठासीनाखाली सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी उपायुक्त विनायक औगड, चंदन पाटील, नगरसचिव मदन तांबकेर यांनी कामकाजात सहभाग नोंदविला. सभा सुरु होताच सदस्यांच्या गणपुर्ती अभावी १० मिनीट सभा स्थगित करण्याचा निर्णय महापौरांनी घेतला. त्यानंतर पुन्हा सभेचे कामकाज सुरु होताच मागील सभेचे कार्यवृत्तांत कायम करताना काही बाबींवर सदस्यांनी आक्षेप नोंदविला. संत ज्ञानेश्वर सभागृहातील अपहार प्र्रकरणी संबंधितावर कारवाईच्या मागणीसाठी अरुण जयस्वाल, प्रदीप बाजड, विजय नागपुरे, अमोल ठाकरे, कांचन ग्रेसपुंजे, अजय सामदेकर, विजय नागपुरे, दिनेश बूब आदींनी पुढाकार घेतला.