शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

कला महोत्सवात मातोश्री सरस्वती वाठ विद्यालय अव्वल

By admin | Updated: September 28, 2015 00:24 IST

राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान पंचायत समिती नांदगाव खंडेश्वरअंतर्गत तालुकास्तरीय कला महोत्सव शुक्रवारी एकलव्य क्रीडा अकादमी येथे पार पडला.

नांदगाव खंडेश्वर : राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान पंचायत समिती नांदगाव खंडेश्वरअंतर्गत तालुकास्तरीय कला महोत्सव शुक्रवारी एकलव्य क्रीडा अकादमी येथे पार पडला. या महोत्सवात दाभा येथील मातोश्री सरस्वती वाठ माध्यमिक विद्यालयाच्या चमूने प्रथम क्रमांक पटकाविला. बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपशिक्षणाधिकारी अनिल कांबे तर उद्घाटक चित्रपट निर्माता संजय सिंगलवार होते. प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार बी. व्ही. वाहूरवाघ, गटविकास अधिकारी सुरेश गोहाड, गटशिक्षणाधिकारी वसंत मुंदे, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीकृष्ण ढोमणे, मुख्याध्यापक शरद तिरमारे आदी उपस्थित होते. तालुकास्तरीय कला महोत्सवात ३१ विद्यालयाने सहभाग घेतला होता. यात विद्यार्थ्यांनी भौतिक क्षमतेसोबतच कलागुणांची चुणूक दाखविली. लोकनृत्य, लोकनाट्य, लोकसंगीत, लोकदृष्य सादरीकरणाच्या माध्यमातून पथनाट्य नृत्य सादर केले. यात दाभा येथील मातोश्री सरस्वती वाठ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित पेरणी करतानाचे नृत्य सादर करून दुष्काळात शेतकऱ्यांची निर्माण झालेली वस्तुस्थिती सादर केली. अस्मानी संकटाला घाबरुन न जाता बळीराजाने आत्महत्या करू नये, असा संदेश नृत्याच्या सादरीकरणातून देण्यात आला. हे नृत्य मुख्याध्यापक शरद तिरमारे यांच्या मार्गदर्शनाखाली बसविण्यात आले होते. निशा मोकासे, शीतल घोडेस्वार, साक्षी जामनिक, गायत्री इंगळे, साक्षी कडू, सारिका खंडारे, दिव्या मानापुरे, विशाखा श्रृंगारे, तेजस्विनी लढके, स्नेहा कोटांगळे, आचल आखरे, पायल इंगळे, निखिल उमाळे, प्रतीक इंगळे या विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्याचे सादरीकरण केले. सहायक शिक्षक नितीन तायडे, डी. एन. झेले, सुरेश मोलके, पी. डी. ठवकर, अभिजित गुढे, मिलिंद तायडे, गोवर्धन भेदोडकर, मदन खंडारे आदींनी अथक परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)