शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

इर्विन रुग्णालयात सारीने ७३ रुग्णांचा मृत्यू, एप्रिल महिन्यात ७४५ दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 05:00 IST

जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना चाचणी नियमित सुरू असून, पॉझिटिव्ह रुग्णांना सुपर स्पेशालिटीत उपचारार्थ पाठविले जात आहे.  सारीच्या रुग्णांवर येथील वाॅर्ड ५ मध्ये उपचार सुरू आहेत. या रुग्णांना कोरोनासमानच लक्षणे असल्याने ऑक्सिजन लेव्हल कमी होण्याचा धोका अधिक असतो. त्यासाठी ऑक्सिजनचा मुलबक प्रमाणात पुरवठा व्हावा, यासाठी उभारलेल्या लिक्विड ऑक्सिजन टँकमधून या वाॅर्डाकरिता पुरवठा जोडला गेला आहे.

ठळक मुद्देमहिनाभरातील आकडे, ‘सारी टू कोविड पॉझिटिव्ह’ने नऊ मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालयात एप्रिल महिन्यात दाखल ७४५ रुग्णांपैकी ७३ जणांचा सारीने, तर नऊ जण सारीतून कोरोना पॉझिटिव्ह आल्याने उपचारादरम्यान दगावल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली.
जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना चाचणी नियमित सुरू असून, पॉझिटिव्ह रुग्णांना सुपर स्पेशालिटीत उपचारार्थ पाठविले जात आहे.  सारीच्या रुग्णांवर येथील वाॅर्ड ५ मध्ये उपचार सुरू आहेत. या रुग्णांना कोरोनासमानच लक्षणे असल्याने ऑक्सिजन लेव्हल कमी होण्याचा धोका अधिक असतो. त्यासाठी ऑक्सिजनचा मुलबक प्रमाणात पुरवठा व्हावा, यासाठी उभारलेल्या लिक्विड ऑक्सिजन टँकमधून या वाॅर्डाकरिता पुरवठा जोडला गेला आहे. ऑक्सिजनचा पुरवठा होत असला तरी रुग्णांकडून उपचाराला प्रतिसाद मिळणे हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे.
एप्रिल महिन्यात इर्विन रुग्णालयात जिल्ह्यातील ७४५ रुग्ण सारी आजारावरील उपचारार्थ दाखल झाले. त्यांच्यावर सारीसह अन्य आजारांचा प्रादुर्भाव टाळण्याकरिता कोरोना चाचणी करण्यात आली. पैकी ३९५ रुग्ण ‘सारी टू कोविड पॉझिटिव्ह’ झाले आहेत. 
रुग्णांवर उपचार करण्यात आले. मात्र, प्रतिसाद न मिळू शकल्याने नऊ जणांना जीव गमवावा लागला. यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो होऊ शकला नाही.
 

एकाच दिवशी दोन मृत्यू
सारी आजारावर उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १४ एप्रिल रोजी एकाचा, २० रोजी एक, २१ रोजी एक, २२ रोजी एक, ३० एप्रिलला एक, तर २४ आणि २८ एप्रिल रोजी प्रत्येकी २-२ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे ७३ अधिक ९ असे एकूण ८२ सारीचे रुग्ण एकाच महिन्यात दगावल्याचा जिल्ह्याला धक्का बसला आहे.

 

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटल