शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांच्या उपस्थितीत गाजली नगरपालिकेची सभा

By admin | Updated: May 15, 2016 00:03 IST

येत्या दिवाळीपर्यंत रमाई आवास योजनेंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना घरकूल देण्यासोबतच शहरातील रस्त्यावरील अतिक्रमणाचा मुद्दा ....

मूलभूत समस्या ऐरणीवर : अतिक्रमणाचा मुद्दा गाजलापरतवाडा : येत्या दिवाळीपर्यंत रमाई आवास योजनेंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना घरकूल देण्यासोबतच शहरातील रस्त्यावरील अतिक्रमणाचा मुद्दा अचलपूर नगर पालिकेच्या सभेत चांगलाच गाजला. नागरिकांच्या मूलभूत समस्या निकाली काढण्यात कामचुकारपणा अधिकाऱ्यांना खुद्द आ. बच्चू कडू यांनी चांगलेच धारेवर धरले असून नगर पालिकेत भ्रष्टाचार करणाऱ्यांची गय केल्या जाणार नाही असा खणखणीत इशाराही त्यांनी सभेत दिला.अचलपूर पालिकेची सभा आ. बच्चू कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी पार पडली. सभेत जुळ्या शहरातील अतिक्रमण नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. हेच अपघातासाठी कारणीभूत ठरत असल्याने शहरातील अतिक्रम हटविण्याची मागणी केली. येत्या दिवाळीपर्यंत रमाई आवास योजनेंतर्गत एस.सी., एस.टी. तसेच बीपीएलच्या लाभार्थ्यांना घरकूलसाठी त्यांचा प्रस्ताव पाठविण्याचे ठरले आहे. सर्वेक्षणाचे आदेश पालिकेला देण्यात आले. घरकूल योजनेत सुुलतानपुरा भागात झालेल्या भ्रष्टाचाराबाबत एसडीओंच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करून दोषींवर कायदेशीर कारवाईच्या सूचना सभेत दिल्या. पंतप्रधान आवास योजनेसाठी १६ ते ३१ मे पर्यंत आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी कालावधी असून जनजागृती व्हावी, यासाठी जाहिरात, फ्लॅक्सव्दारे प्रचार व प्रसार करण्यात येणार आहे. आतापर्यंत गोळा झालेले अर्ज आॅनलाईन भरण्याची कारवाई न केल्याबाबत प्रशासनाला जाब विचारण्यात आला. येत्या काही दिवसांतच पावसाळ्याला सुरुवात होणार असल्याने सापन व बिच्छन नदीच्या संरक्षक भिंतीचे बांधकाम करण्याच्या सूचना करण्यात आल्या. याबाबत विकास आराखडा तयार करण्याचे आदेशही सभेत देण्यात आलेत. (प्रतिनिधी)