शहरं
Join us  
Trending Stories
1
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
2
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
3
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
4
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
5
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिक्कीमच्या तरूणांसोबत खेळला फुटबॉल, PHOTOSची रंगली चर्चा
6
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
7
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
8
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
9
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
10
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
11
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
12
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
13
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
14
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
15
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
16
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
17
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
18
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
19
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
20
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वच्छ अमरावती’चे भविष्य नागरिकांच्या हाती

By admin | Updated: January 9, 2017 00:02 IST

महापालिका हद्दीतील स्वच्छतेसाठी दिल्या जाणाऱ्या दोन हजार गुणांपैकी तब्बल ६०० गुणांचा ‘फैसला’ शहरातील नागरिकांना करावयाचा आहे.

तिसऱ्या आठवड्यात तपासणी : पूर्वतयारीला वेगप्रदीप भाकरे अमरावतीमहापालिका हद्दीतील स्वच्छतेसाठी दिल्या जाणाऱ्या दोन हजार गुणांपैकी तब्बल ६०० गुणांचा ‘फैसला’ शहरातील नागरिकांना करावयाचा आहे. शहरातील स्वच्छतेबाबत नागरिकांनी दिलेल्या उत्तरासह घनकचरा व्यवस्थापन, शौचालयांची स्थिती या मुद्यांवर स्वच्छ शहराचे गुणांकन केले जाईल. १७ ते १९ जानेवारी दरम्यान केंद्र सरकारच्या प्रतिनिधींद्वारे (क्यूसीआय) शहराचे सर्वेक्षण होणार असून महापालिकेने स्वच्छतेसाठी केलेल्या उपाययोजना, प्रत्यक्ष स्थळपाहणी व नागरिकांशी संवाद या तीन टप्प्यांद्वारे गुणांकन केले जाईल. शहरात स्वच्छता आहे की नाही, कचरा घेण्यासाठी घंटागाडी नियमित येते की नाही, आपल्या भागात कचराकुंडी आहे की नाही, अशा प्रश्नांची उत्तरे अमरावतीकर नागरिक कशी देतात, यावर सगळे अवंलबून असेल. मात्र, नागरिकांनी वास्तवातील उत्तरे दिलीत तर मनपाची लक्तरे वेशीवर टांगली जातील. ‘स्वच्छ भारत अभियानां’तर्गत ४ जानेवारीपासून देशभरातील ५०० शहरांचे सर्वेक्षण सुरू झाले आहे. २००० गुणांच्या यापरीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे आणि वैद्यकीय आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांनी जोरकस प्रयत्न चालविले आहेत. वैयक्तिक शौचालय उभारणीसह स्वच्छ शहराकडे पालिकेने लक्ष केंद्रीत केले असून त्यासाठीच्या पूर्वतयारीने वेग घेतला आहे. ४ फेब्रुवारीपर्यंतच्या या सर्वेक्षणात केंद्राचे स्वच्छता पथक संबंधित शहरात जाऊन वस्तुस्थिती तपासणार आहे. १५ फेब्रुवारीला देशभरातील ५०० शहरांचे स्वच्छता क्रमांक जाहीर होतील. स्वच्छता सर्वेक्षणात तीन टप्प्यात गुणांकन केले जाणार आहे. दोन हजार गुणांपैकी ९०० गुण महापालिकेने शहर स्वच्छतेबाबत केलेल्या सुविधा, वाहतूक, प्रक्रिया, माहितीपत्रके, रेकॉर्डस, फोटोग्राफ्स, जनजागृती व अन्य मुद्यांसाठी असणार आहे. ५०० गुण प्रत्यक्षस्थळ पाहणीसाठी दिले जातील. याअंतर्गत संबंधित तपासणी पथक (क्यूसीआय) शहरातील रस्त्यांवरील कचराकुंड्याची स्थिती, कचरा वाहतुकीची स्थिती, कचरा डेपोची स्थिती, तेथील प्रकल्प, कचरा वाहणाऱ्या वाहनांची स्थिती, कचरा संकलन व सफाई कामगारांना सुविधा, शौचालय, नागरी वसाहत, रेल्वेस्टेशन, डेपो, शाळा, हॉटेल्स, भाजीबाजार, धार्मिक स्थळे आदी मुद्दे विचारात घेणार आहेत. त्यानंतर नागरिकांना सहा प्रश्न विचारून प्राप्त उत्तरातून उर्वरित ६०० गुणांपैकी अंतिम गुणांकन होईल. दोन हजार गुणांतून अमरावतीचे अंतिम गुण व देशातील पाचशे शहरातील अंतिम स्वच्छता क्रमांक ठरणार आहे. त्यासाठी महापालिका ‘स्वच्छता अ‍ॅप’वर आलेल्या प्रत्येक तक्रारीकडे लक्ष पुरवित आहे. कचराकुंड्या ओव्हरफ्लोशहरातील पाचही प्रशासकीय झोनमधून निघणारा कचरा संकलित करण्यासाठी वर्षाकाठी १२ कोटी रुपये खर्च केले जातात. मात्र, शहरातील अनेक कंटेनर ओव्हरफ्लो झालेले दिसतात. घंटागाड्यांची दुरवस्था झाली आहे. शहरातील बाजारपेठांसह मुस्लिमबहुल वस्त्यांमध्ये कचरा अस्तव्यस्त पसरलेला असतो.कचरा पेटविण्याचा गोरखधंदाशहरातील अनेक भागात नागरिक आणि कंत्राटदारांच्या कामगारांकडून कचरा पेटविला जातो. त्यामुळे प्रदूषणात वाढ झाली आहे. इतवारा बाजारातील प्रकल्प अद्यापही पूर्ण क्षमतेने सुरू झालेला नाही. सुकळीमधील प्रकल्प अद्याप अधांतरी आहेत. शहरातील मोकळ्या जागी कचरा अस्तव्यस्त पडलेला असतो. मोकाट जनावरे हा कचरा इतरत्र पसरवून टाकतात.नागरिकांमध्ये जनजागृती सुरू स्वच्छतेचा पुरता बोजवारा उडाल्याचे स्वच्छता सर्वेक्षणात उघड होऊ नये म्हणून महापालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. सर्वेक्षणासाठी ९ दिवसांचा कालावधी शिल्लक असताना शहर सर्वाथाने चकाचक करण्याचा चंग पालिका प्रशासनाने बांधला आहे. त्यादृष्टीने स्वच्छता अ‍ॅप, तक्रारींची सोडवणूक, वैयक्तिक शौचालयाची उभारणी, कंटेनर याकडे लक्ष पुरविले जात आहे.