जैन मंदिरातील पाच मूर्तीसह चांदीचे छत्र लंपास ! मध्य प्रदेशाच्या सीमेवर खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 14:26 IST2026-05-09T14:24:03+5:302026-05-09T14:26:12+5:30

Amravati : रवाळा गावालगत असलेल्या पार्वोदय तीर्थक्षेत्र नागठाणा दिगंबर जैन मंदिर येथे गर्भगृहातून चोरट्यांनी अष्टधातूच्या पाच मौल्यवान मूर्ती आणि चांदीचे छत्र, असा मुद्देमाल लंपास केला.

Five idols along with a silver umbrella from a Jain temple go missing! There is a stir on the border of Madhya Pradesh | जैन मंदिरातील पाच मूर्तीसह चांदीचे छत्र लंपास ! मध्य प्रदेशाच्या सीमेवर खळबळ

Five idols along with a silver umbrella from a Jain temple go missing! There is a stir on the border of Madhya Pradesh

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :
रवाळा गावालगत असलेल्या पार्वोदय तीर्थक्षेत्र नागठाणा दिगंबर जैन मंदिर येथे गर्भगृहातून चोरट्यांनी अष्टधातूच्या पाच मौल्यवान मूर्ती आणि चांदीचे छत्र, असा मुद्देमाल लंपास केला. दि. ७ मे रोजी पहाटे ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी, शेंदुरजनाघाट पोलिसांनी पुजारी रूपेश इदाने यांच्या तक्रारीवरून अज्ञाताविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला.

दि. ७ मे रोजीच्या मध्यरात्री पुजारी आणि सेवादार झोपलेले असताना अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला. वेदीवर असलेल्या अत्यंत प्राचीन आणि जागृत मानल्या जाणाऱ्या मूर्तीवर चोरट्यांनी डल्ला मारला. पहाटे ५ च्या सुमारास मंदिरातील मूर्ती व छत्र गायब असल्याचे तेथीलच एका महिलेने फिर्यादी पुजाऱ्याला उठवून सांगितले. त्यांनी तत्काळ या घटनेची माहिती मंदिर समितीला आणि पोलिस स्टेशनला दिली. आरोपीने एकूण ३१ किलो वजनाचा ५७हजार रुपये किमतीच्या त्या मूर्ती व छत्र चोरून नेले आहे.

तपासाची चक्रे फिरली

घटनेची माहिती मिळताच शेंदूरजनाघाट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चोरीचा तपास करण्यासाठी फॉरेन्सिक लॅब आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. अमरावती ग्रामीण एलसीबीचे पथकही समांतर तपास करत आहे. या प्रकरणातील संशयितांचा शोध घेण्यासाठी मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र अशा दोन्ही राज्यांच्या सीमावर्ती भागात नाकेबंदी करण्यात आली आहे.

काय चोरीला गेले?

११ किलो वजनाची भगवान आदिनाथ स्वामींची मूर्ती
५ किलो वजनाची मुनीसुव्रतनाथ यांची मूर्ती
४ किलो वजनाची श्री विमलसागर गुरूमूर्ती
४ किलो वजनाची सन्मती सागर गुरूमूर्ती
५ किलो वजनाची पद्मावती देवीची मूर्ती व पाषाण मूर्तीवरील छत्र

Web Title : जैन मंदिर में चोरी: मूर्तियाँ और चांदी का छत्र गायब, सीमा पर अलर्ट!

Web Summary : रवाला के पास नागठाणा जैन मंदिर से पाँच अष्टधातु की मूर्तियाँ और एक चांदी का छत्र चोरी हो गया। पुलिस जांच जारी, महाराष्ट्र और मध्य प्रदेश के बीच सीमा सील। ₹57,000 मूल्य की वस्तुएं चोरी।

Web Title : Jain Temple Theft: Idols and Silver Canopy Stolen, Border Alert!

Web Summary : Five Ashtadhatu idols and a silver canopy were stolen from Nagthana Jain temple near Rawala. Police investigation underway, borders sealed between Maharashtra and Madhya Pradesh. Valuables worth ₹57,000 stolen.