शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

वांगी, टोमॅटोने बिघडविले बजेट हिरव्या मिरचीने केले तोंड लाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2021 05:00 IST

जिल्ह्यातील ग्रामीण भागातून उत्पादित भाजीपाला कमी येत असल्याने बाहेर जिल्ह्यातून दररोज हजारो क्विंटटल भाजीपाला शहरात येतो. त्यात डिझेलच्या दरवाढीमुळे वाहतुकीचा खर्च पाहता भाजीपाला मंगळवारी ५० ते १६० रुपये प्रतिकिलोने नागरिकांना खरेदी करावा लागल्याचे वास्तव आहे.

इंदल चव्हाणलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ऑक्टोबरच्या संततधार पावसाने भाजीपाला खराब झाला. त्यामुळे बाजारपेठेत आवक कमी व वाढता वाहतूक खर्च पाहता दामदुप्पट दराने भाजीपाला खरेदी करण्याची वेळ नागरिकांवर आलेली आहे. त्यात बारमाही उपयोगात येणाऱ्या वांगीने आर्थिक बजेट बिघडविले, तर हिरवी मिरची ८० रुपयांवर पोहचल्यामुळे गृहिणींचे तोंड लाल झाले आहे.जिल्ह्यातील ग्रामीण भागातून उत्पादित भाजीपाला कमी येत असल्याने बाहेर जिल्ह्यातून दररोज हजारो क्विंटटल भाजीपाला शहरात येतो. त्यात डिझेलच्या दरवाढीमुळे वाहतुकीचा खर्च पाहता भाजीपाला मंगळवारी ५० ते १६० रुपये प्रतिकिलोने नागरिकांना खरेदी करावा लागल्याचे वास्तव आहे.

नाशिकहून येतो टोमॅटोजिल्ह्यात टोमॅटोचे उत्पादन फार कमी प्रमाणात घेण्यात येते. वाढत्या मागणीनुसार टोमॅटोची तोकडी आवक नागरिकांची गरज भागवू शकत नसल्याने नाशिक येथून टोमॅटो बोलविला जातो. त्यातच डिझेल दरवाढीने वाहतूक खर्चापोटी कधी नव्हे इतके भाव टोमॅटोचे वाढलेले पहावयास मिळत आहे.

कांदा दिवाळीपर्यंत ६० जिल्ह्यात कांदा धुळे, सोलापूर व कर्नाटक राज्यातून बोलावले जातात. मात्र, पाऊस सुरू राहिल्याने धुळे, सोलापूरसह कर्नाटक येथून होणारी कांद्याची आवक कमी झाली. त्यामुळे यंदाही दिवाळीत कांदा ५० ते ६० रुपयांपर्यंत खरेदी करावा लागणार असल्याची माहिती कांद्याचे व्यापारी सतीश कावरे यांनी दिली.

भाजीपाल्याचे दर अपेक्षेपेक्षा अधिक वाढल्याने अर्धा किलोऐवजी एकच पाव घ्यावा लागत आहे. परंतु, स्वस्त असो वा महाग गरजेनुसार खरेदी करावाच लागतो. - अर्चना गौतम मेश्राम, गृहिणी

सर्व डाळींचेही दर वाढलेले असून, पावसाने भाजीपाला खराब झाल्यामुळे तेदेखील कधी नव्हे इतके वाढले आहे. सामान्य माणूस महागाईने डबघाईस येऊ लागला आहे - रमेश राठोड, एक ग्राहक

पावसामुळे खराब झाला. तसेच वाहतूक खर्च प्रतीकिलो १० रुपये झाल्याने भाजीपाल्याचे दर सद्यस्थितीत सर्वाधिक आहे. आम्हाला २-५ रुपये नफ्याने विकावा लागत आहे.     - प्रकाश बाहेकर, विक्रेता

 

टॅग्स :vegetableभाज्या