शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

अचलपूर बाजार समितीचा लेखापील सेवेतून बडतर्फ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 11:03 IST

Amravati : स्पीड पोस्टने नोटीस, बाजार समितीने आचारसंहिता भंग केल्याची तक्रार

अनिल कडू लोकमत न्यूज नेटवर्क परतवाडा : ऐन दिवाळीच्या तोंडावर विधानसभेच्या आचारसंहिता दरम्यान अचलपूर बाजार समितीने निलंबित लेखापालाला सेवेतून बडतर्फ केले. २०२०-२१ आणि २०२१-२२ या वर्षातील आर्थिक अनियमिततेचा ठपका ठेवत २६ ऑक्टोबरच्या सभेत हा बडतर्फीचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे.

बडतर्फ लेखापाल यांची नोटीस प्रभारी सचिवांनी स्पीड पोस्टाने बजावली. संबंधित लेखापाल आजारी असल्यामुळे ते परतवाड्यातील खासगी रुग्णालयात औषधोपचार घेत होते. यादरम्यान त्यांच्या सुटीचा अर्ज घेऊन मुलगा बाजार समितीच्या कार्यालयात पोहोचला तेव्हा त्याला हा प्रकार कळला. मुलाने वडिलांच्या बडतर्फीची नोटीस घेण्यास नकार दिल्यावरून स्पीड पोस्टाने ती पाठविण्यात आल्याचे प्रभारी सचिवांनी स्पष्ट केले 

दरम्यान, बडतर्फ लेखापालांवर लेखापरीक्षणात गंभीर आरोप आहेत. स्वतंत्र चौकशी पथकात दोषी आढळले आहेत. खोटे पावती बुक छापून लाखो रुपयांची वसुली केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. खुलाशात समाधानकारक उत्तर मिळू शकले नसल्याने कारवाई झाली, अशी माहिती सभापती राजेंद्र गोरले यांनी दिली. 

आचारसंहितेचा भंगविधानसभा निवडणूक आचारसंहिता दरम्यान अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची २६ ऑक्टोबरला पार पडलेली संचालक मंडळाची सभा आचारसंहितेचा भंग करणारी ठरली असल्याची तक्रार संबंधित लेखापालांनी अचलपूर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासह जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सहायक निबंधक सहकारी संस्था अचलपूर, तहसीलदार, उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्याकडे ७ नोव्हेंबरला केली आहे.

कारवाईची मागणीसभेच्या नोटिसवर प्रभारी सचिवांनी धोरणात्मक विषय विषयसूचीवर घेऊन १५ संचालकांसमक्ष विविध धोरणात्मक विषयांवर चर्चा करून ठराव पारित केले. याच सभेत दोन लाभार्थीना प्रत्येकी पाच हजार रुपयांप्रमाणे देणगी खर्चाचे धनादेश दिले. मयत व्यक्तीच्या नावेसुद्धा देणगी दिली गेली. हे आचारसंहितेचे उल्लंघन असून कार्यालयीन दस्ताऐवज जप्त करून याबाबीची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी तक्रारकत्याने केली आहे.

"२६ ऑक्टोबरच्या सभेत कुठलाही धोरणात्मक निर्णय झाला नाही. आचारसंहितेपूर्वी पार पडलेल्या बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेत ठरवले गेलेले विषय सभेत घेतले गेले. ही सभा प्रशासकीय कामकाजाचा भाग होती. त्यात आचारसंहितेचा भंग नाही." - योगेश चव्हाण, प्रभारी सचिव. अचलपूर बाजार समिती

टॅग्स :achalpur-acअचलपूरAmravatiअमरावती