शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

सावकारांकडून घेतलेले कर्ज माफ !

By admin | Updated: May 3, 2015 00:31 IST

दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या नोंदणीकृत खासगी सावकारांकडील कर्जमाफीचा सरकार आदेश अखेर जारी करण्यात आला आहे.

परवानाधारकांकडे धडकले आदेश : शेतकऱ्यांना दिलासा, अंमलबजावणी सुरू जितेंद्र दखणे अमरावतीदुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या नोंदणीकृत खासगी सावकारांकडील कर्जमाफीचा सरकार आदेश अखेर जारी करण्यात आला आहे. युती शासनाने पहिल्याच हिवाळी अधिवेशनात यासंदर्भात घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्षात आदेश काढण्यासाठी राज्य शासनाने ४ महिन्यांचा कालावधी लागला. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांचे ३० नोव्हेंबर २०१४ अखेर देय असलेले कर्ज आणि त्यावरील ३० जून २०१५ पर्यंतच्या सत्रात माफी मिळणार आहे. यंदा सर्वत्र दुष्काळी स्थिती आहे. सततच्या नैसर्गिक संकटाच्या पार्श्वभूमीवर या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ होत आहे. खासगी सावकारांकडील कर्ज हे शेतकऱ्यांच्या आत्महत्यामागील प्रमुख कारण असल्याने विविध समितींच्या अहवालांतून पुढे आले आहे. सावकारांकडून शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जास माफी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याबाबतचे आदेश प्राप्त झालेत. कर्ज माफीस पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांनी संबंधित तालुक्याचे सहनिबंधक यांच्याकडे अर्ज करावा.- गौतम वालदे, जिल्हा निबंधक.