शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

अचलपूर नगरपालिकेत रंगणार ‘अर्थ’कारण

By admin | Updated: July 7, 2014 23:22 IST

नगराध्यक्ष पदासाठी ३० जुलैच्या आत निवडणुक होणार आहे. यासाठी स्थानिक राजकीय आराखडे मांडले जात आहे. या निवडणुकीत ‘अर्थ’कारणाला विशेष महत्त्व येणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

सुनील देशपांडे - अचलपूरनगराध्यक्ष पदासाठी ३० जुलैच्या आत निवडणुक होणार आहे. यासाठी स्थानिक राजकीय आराखडे मांडले जात आहे. या निवडणुकीत ‘अर्थ’कारणाला विशेष महत्त्व येणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. नगराध्यक्षपदासाठी ईर्ष्येला पेटलेल्यांकडून या बिदागीमध्ये आणखी वाढ होणे शक्य आहे. अमरावती जिल्ह्यातील सर्वाधिक महत्त्वाची नगरपालिका म्हणून अचलपूरचे नाव आहे. ही ‘अ’ वर्ग नगरपालिका आहे. यात एकूण ३८ नगरसेवक आहेत. दीड-दोन दशकांपासून अस्थिरतेच्या गर्तेत सापडलेल्या या पालिकेच्या तिजोरीत विकास कामांसाठी ठणठणाट आहे. अर्थकारण मनासारखे झाल्याशिवाय कंत्राटदाराला काम मिळत नाही, हे सर्वश्रृत आहे. त्यामुळे अनेक कंत्राटदार कामे घेण्यास उत्सुक दिसत नाहीत. त्यामुळे कित्येक कामे अपूर्णावस्थेत आहेत. अपूर्ण आणि प्रलंबित विकास कामे पूर्ण करणे आर्थिकदृष्ट्या अशक्य असले तरी अचलपूरच्या नगराध्यक्ष पदाचा काटेरी मुकूट मिळविण्यासाठी चार ते पाच नगरसेवकांमध्ये टोकाची स्पर्धा आहे. काही नगरसेवक किंगमेकरची भूमिका वठवीत असून त्यासाठी त्यांनी इच्छुकांकडून रसद घेतल्याची चर्चा पालिकेच्या राजकारणात चर्चिली जात आहे. उर्वरित रसद निवडणुकीच्या ४ ते ५ दिवस अगोदर मिळणार आहे.अचलपूर नगरपालिकेत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आतापर्यंत साम, दामाचा वापर झाला आहे. दंड, भेदाची नीती अद्यापपर्यंत आली नाही. अडीच वर्षांनंतर नगराध्यक्ष निवडीसाठी इच्छुकांनी दामाचे आयुध पाजळून ठेवले होते. दंड, भेद येथे बोथट ठरतो. सरकारने विद्यमान नगराध्यक्षांनाच सहा महिने मुदतवाढीचा पवित्रा घेतल्याने अनेक नगरसेवकांचा हीरमोड झाला होता. विरोधातील नगरसेवकांचा विरोधही तोकडा होता. काही विरोधकांनी सत्तेत सहभागी होत बरोबरी साधली. आता २ जुलै रोजी झालेल्या बैठकीत मुदतवाढीचा निर्णय मागे घेतल्याने उर्वरित अडीच वर्षांसाठी नवीन पदाधिकारी निवडीचा मार्ग मोकळा करताच ‘थैल्या’ सैल सोडणे सुरू झाले आहे. जुळ्या शहरात ठिकठिकाणी पडलेल्या कचऱ्याच्या उकिरड्याचे ढीग, तुडूंब भरलेल्या नाल्या, त्यात रोगट हवामान अशी परिस्थिती आहे. पावसाअभावी सर्वसामान्यांचा जीव टांगणीला लागला आहे. अशा स्थितीत काही नगरसेवकांना मात्र चंगळीची स्वप्ने पडत आहेत. देवदर्शनासह मनसोक्त खरेदी आणि पुन्हा ८ ते १० लाखांची खुशाली, अशी साधारण बोलणी सुरू आहे.