शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेलमधील आगीत गुदमरुन केबल नेटवर्क अधिकाऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2021 05:00 IST

हाॅटेलच्या सहा रूममध्ये सहा ग्राहक होते. पैकी दुबे, शेलार, पाटील, चौरसिया व शहा या पाच जणांना राजापेठ पोलिसांनी सुखरूप बाहेर काढले. ठाणेदार मनीष ठाकरे व त्यांची टीम लागलीच घटनास्थळी पोहोचली. पीएसआय कृष्णा मापारी, कर्मचारी दुलाराम देवकर, अमोल खंडेझोड, राहुल ढे॑गेकर, नीलेश पोकळे, अतुल स॑भे, दानिश शेख, प्रशांत गिरडे, ढवळे यांनी प्राणाची बाजी लावत त्यांना हॉटेलबाहेर काढले.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राजापेठ ठाण्यासमोरील हॉटेल इम्पेरियामधील इलेक्ट्रिक पॅनेलला आग लागल्यानंतर ऑक्सिजनअभावी एकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री ३ च्या सुमारास घडली. दिलीप चंद्रकांत ठक्कर (५४, रा. जमुना क्रमांक ३, सीए रोड, नागपूर) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी मृताचे जावई चेतन तेली (एकनाथपूरम) यांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी हॉटेल संचालक रितेश लुल्ला (३२. रामपुरी कॅम्प) विरूद्ध गुन्हा दाखल केला. या घटनेने हॉटेलमधील सुरक्षाव्यवस्था चव्हाट्यावर आली.    इम्पेरिया या चार माळ्याच्या हॉटेलमधील तिसऱ्या मजल्यावर १३ खोल्या असून, त्यासमोरच इलेक्ट्रिक पॅनेल आहे. त्याला रात्री २ नंतर शार्टसर्किटने आग लागली. ती आग धुमसत असतानाच धुराचा प्रचंड लोळ उठला. पुरेशी जागा नसल्याने तो धूर खोलीत शिरला. त्या अंधाऱ्या खोल्यांमध्ये देखील व्हेंटिलेशन नव्हते. 

२०२ मध्ये मिळाला मृतदेहजीटीपीएल या केबल नेटवर्कचे विदर्भ व्यवस्थापक असलेले ठक्कर हे खोली क्रमांक २०५ मध्ये थांबलेले होते. त्यांचे पुण्याचे सहकारी दीपेश शहा हे बाजूच्या खोलीत होते. पळापळ झाली तेव्हा, ठक्कर खोलीतून बाहेर पडले. मात्र, पॅसेजमध्ये अंधार व धूर साचल्याने ते बाहेर पडू शकले नाही. त्यांचा मृतदेह खोली क्रमांक २०२ मध्ये आढळून आला. 

‘ते’ पाच जण सुखरूपहाॅटेलच्या सहा रूममध्ये सहा ग्राहक होते. पैकी दुबे, शेलार, पाटील, चौरसिया व शहा या पाच जणांना राजापेठ पोलिसांनी सुखरूप बाहेर काढले. ठाणेदार मनीष ठाकरे व त्यांची टीम लागलीच घटनास्थळी पोहोचली. पीएसआय कृष्णा मापारी, कर्मचारी दुलाराम देवकर, अमोल खंडेझोड, राहुल ढे॑गेकर, नीलेश पोकळे, अतुल स॑भे, दानिश शेख, प्रशांत गिरडे, ढवळे यांनी प्राणाची बाजी लावत त्यांना हॉटेलबाहेर काढले.

ना इमरजंसी एक्झिट, ना फायर ऑडिटहॉटेलमध्ये इमरजंसी एक्झिटअभावी ग्राहकाचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. बाहेर पडण्याच्या मार्गात आग लागल्याने रस्ता अवरूद्ध झाला. त्यामुळे ठक्कर हे बाहेर निधू शकले नाही. या हॉटेलचे फायर ऑडिट झाले नसल्याचे चौकशीत सांगण्यात आले.

 

टॅग्स :fireआगhotelहॉटेल