शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

दिवसा उकाडा, रात्री गारवा

By admin | Updated: September 29, 2014 22:53 IST

दिवसा उकाडा व रात्रीचा गारवा असे वातावरण अमरावतीकर सध्या अनुभवत आहेत. यंदा वापसा उशिरा आल्याने येत्या ८ ते १० दिवस उकाडा कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

वैभव बाबरेकर - अमरावतीदिवसा उकाडा व रात्रीचा गारवा असे वातावरण अमरावतीकर सध्या अनुभवत आहेत. यंदा वापसा उशिरा आल्याने येत्या ८ ते १० दिवस उकाडा कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मध्यंतरी पावसाने दांडी मारली. तसेच सप्टेंबरमध्ये ऊन्ह, पाऊस व ढगाळ वातावरण दिसून आले. मात्र काही दिवसांपासून पाऊस अचानक बंद झाल्याने उन्हाची तीव्रता वाढली आहे. उन्हामुळे जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन होत असल्यामुळे उकाडा निर्माण झाला आहे. तापमान ३५ डिग्री सेल्सिअसवर पोहचल्याने जमिनीतील पाण्याची वाफ तयार व्हायला लागली आहे. या वाफेमुळे उकाड्याची स्थिती निर्माण झाली आहे. ही वाफ रात्रीच्या वेळेस थंडी होत असल्यामुळे रात्री गारवा निर्माण करीत आहे. त्यामुळे रात्री काही प्रमाणात थंडीसुध्दा वाजत आहे. उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन होत आहे आणि त्या बाष्पाचे रुपांतर दवबिंदूत होत आहे. त्यामुळे रात्रीच्या वातावरणात धुकेसुध्दा निर्माण होताना दिसून येत आहे. दिवसा उकाडा व रात्री थंडी असे वातावरण तयार झाल्याने जिल्ह्यात रोगराईने तोंड वर काढल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक घरातील एक सदस्य ताप, सर्दी व खोकल्यासारख्या आजाराने ग्रस्त झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात बहुतांश कुटुंबीयांमध्ये एक सदस्य आजाराने ग्रस्त असल्याचे निश्चितच दिसून येत आहे. हा वातावरणाचा प्रभाव असल्याचे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी वर्तविले आहे. कॅलेंडरनुसार जरी वापसा संपला असला तरी निसर्गातील बदलामुळे वापस्याची जाणीव होत आहे.