शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती बाजार समितीत 'बिहारी राज'

By admin | Updated: November 19, 2015 00:43 IST

तब्बल १४०० कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेल्या अमरावती बाजार समितीत बिहारी मजूर नियमबाह््यरित्या कार्यरत आहेत.

नियमांना खो : जिल्हाधिकारी, पालकमंत्री करणार का चौकशी? अमरावती : तब्बल १४०० कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेल्या अमरावती बाजार समितीत बिहारी मजूर नियमबाह््यरित्या कार्यरत आहेत. मराठी मजुरांवर नियमांचा हातोडा हाणणाऱ्या बाजार समितीच्या बिहारीप्रेमाविरुद्ध एल्गार छेडण्याच्या तयारीत मराठी मजूर आहे. तसा इशाराच त्यांनी दिला आहे. पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्यास वातावरण वेळीच शांत होऊ शकेल.मराठमोळ्या अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे वैभव असलेल्या बाजार समितीत धान्याची मोठी उलाढाल होते. पोत्यात धान्य भरणे, पोती वाहून नेणे, पोती मालमोटारीत भरणे या स्वरुपाच्या कामांसाठी मजुरांची गरज भासते. ही कामे करण्यासाठी ४०० ते ५०० मजुरांना बाजार समितीने परवाने देऊन अधिकृत केले आहे. नियमानुसार, परवाने असलेला मजूरच बाजार समितीच्या आवारात प्रवेश करू शकतो, काम करू शकतो. परवाने नसलेले; पण गरज असलेले मराठी मजूर बाजार समितीत काम करू शकत नाहीत. मराठी मजुरांसाठी नियम असा काटेकोर असताना बाजार समितीच्या आवारात बिहारहून मुद्दामच आणले गेलेले सुमारे सव्वाशे मजूर नियमबाह्यरित्या कार्यरत आहेत. मराठी मजुरांच्या हक्काचा घास हिरावणाऱ्या या परप्रांतिय मजुरांसाठी बाजार समितीने सारेच नियम का गुंडाळून ठेवले, असा सवाल मराठी मजुरांचा आहे. बिहारी मजुरांना बळअमरावती : बाजार समितीत व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांनी बिहारहून मजुरांना आणले आहे. व्यापाऱ्यांच्या निमंत्रणानुसार टोळीने हे मजूर बाजार समितीच्या आवारात दाखल होतात. मराठी मजूर करतात त्याच मालमोटरी भरण्याच्या कामी त्यांना जुंपले जाते. मराठी मजुरांच्या हक्कावर त्यामुळे गदा आली आहे. हल्ली बाजार समितीत धान्याची आवक अल्न असल्यामुळे मराठी मजुरांच्या हाताला काम नाही. अशा बिकट स्थितीतही बाजार समितीत 'बिहारी राज' असल्यामुळे मराठी मजूर जाम संतापला आहे. मजूर आम्ही आणलेले नाहीत. आम्ही त्यांना परवानेही दिलेले नाहीत, अशी भूमिका घेऊन बाजार समिती व्यापाऱ्यांकडे अंगुलिनिर्देश करतात. तथापि, बिहारचे मजूर मराठी मजूर करतात तेच काम करीत असतील तर त्यांना आणले कुणी हा मुद्दाच गौण ठरतो. व्यापाऱ्यांनी मजूर आणले हे बाजार समितीला मान्य असेल तर व्यापाऱ्यांना मजूर आणता येतात काय? विनापरवाना मजुरांना बाजार समितीत काम करता येते काय? बिहारी मजुरांना अशी मुभा दिली जात असेल तर मराठी मजुरांनाच नियमांच्या बेड्या का? परवाने कशासाठी, या प्रश्नांचे उत्तर बाजार समितीचे सभापती सुनील वऱ्हाडे यांनी द्यावे, अशी अपेक्षा मराठी मजुरांची आहे.