शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मनमानीला चाप

By admin | Updated: May 31, 2016 00:25 IST

नगरविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांमध्ये विविध स्थानिक स्वराज्य संस्थांना अनुदान मंजूर करण्यात येते.

निधी अन्यत्र वळवणे गुन्हा : कारवाईचाही इशाराप्रदीप भाकरे /अमरावती : नगरविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांमध्ये विविध स्थानिक स्वराज्य संस्थांना अनुदान मंजूर करण्यात येते. अशा योजनांसाठी मंजूर केलेल्या अनुदानाचा विनियोग केवळ त्या स्वराज्य संस्थांमार्फत अन्यत्र वळविले जात असल्याच्या घटना निदर्शनास आल्याने त्यावर प्रतिबंध घालणसाठी कडक निर्देश दिले आहेत. नगरविकास विविध योजनांमधील मंजूर केलेला निधी किंवा त्यावरील व्याज अन्यत्र वळविण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान, नगरपरिषदांसाठी वैशिष्ट्यपूर्ण योजना, महानगरपालिका व नगरपालिकांसाठी हद्दवाढ योजना अशा विविध प्रकारच्या योजना नगरविकास विभागामार्फत राबविण्यात येतात व त्यासाठी राज्य शासनाकडून संबंधित नागरी स्थानिक संस्था स्वतंत्र बँक खाते उघडून त्या खात्यात जमा करतात. अशा खात्यामधून सदर रकमा संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जनरल खात्याकडे तात्पुरत्या स्वरुपात कर्ज म्हणून किंवा कायम स्वरुपात वळत्या करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. काही ठिकाणी अशा खात्यामधील जमा रकमांवर प्राप्त झालेल्या व्याजाची रक्कम अन्य खात्याकडे तात्पुरत्या स्वरुपात कर्ज म्हणून किंवा कायमच्यादेखील वळत्या करण्यात आल्याचे नगरविकास विभागाच्या निदर्शनास आले आहे.शासनाने एखाद्या विशेष योजनेसठी मंजूर केलेला निधी किंवा त्यावर प्राप्त झालेले व्याज हे परस्पर वेगळ्या योजनेकडे किंवा वेगळ्या प्रयोजनाकडे वळविण्याचा कोणताही प्राधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना नाही, असेही बजावण्यात आले आहे.अशा आहेत सूचना राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेसंदर्भात नगरविकास विभागाकडून मंजूर करण्यात येणारा निधी किंवा संबंधित निधीच्या खात्यावर जमा झालेले व्याज कोणत्याही परिस्थितीत अन्य योजनेकडे किंवा अन्य प्रयोजनाकडे वळते करण्यात येऊ नये, अशाप्रकारे मूळ निधी किंवा त्यावरील व्याज कायमस्वरपी किंवा तात्पुरत्या अन्यत्र वळविणे ही गंभीर स्वरपाची आर्थिक अनियमितता मानली जाईल. त्यासाठी संबंधित स्थानिक संस्था, संबंधित अधिकारी कारवाईस पात्र ठरतील. यापुढे राज्य शासनाने नगरविकास विभागाच्या कोणत्याही योजनेसाठी मंजूर केलेला निधी फक्त त्याच योजनेसाठी वापरण्यात येईल, याची दक्षता घेण्याच्या सूचना स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आल्या आहेत.अशा आहेत सूचना राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेसंदर्भात नगरविकास विभागाकडून मंजूर करण्यात येणारा निधी किंवा संबंधित निधीच्या खात्यावर जमा झालेले व्याज कोणत्याही परिस्थितीत अन्य योजनेकडे किंवा अन्य प्रयोजनाकडे वळते करण्यात येऊ नये, अशाप्रकारे मूळ निधी किंवा त्यावरील व्याज कायमस्वरपी किंवा तात्पुरत्या अन्यत्र वळविणे ही गंभीर स्वरपाची आर्थिक अनियमितता मानली जाईल. त्यासाठी संबंधित स्थानिक संस्था, संबंधित अधिकारी कारवाईस पात्र ठरतील. यापुढे राज्य शासनाने नगरविकास विभागाच्या कोणत्याही योजनेसाठी मंजूर केलेला निधी फक्त त्याच योजनेसाठी वापरण्यात येईल, याची दक्षता घेण्याच्या सूचना स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आल्या आहेत.राज्य शासनाची पूर्व परवानगी आवश्यकराज्यस्तरावरून ज्या योजनेसाठी विविध टप्प्यांमध्ये अनुदान मंजूर केले जाते व ज्या योजनेमध्ये राज्यशासना सोबतच स्थानिक स्वराज्य संस्थेचा हिस्सा देखीलअंतर्भूत असतो, अशा योजनांसाठी मंजूर केलेल्या निधीवर प्राप्त झालेल्या व्याजाची रक्कम त्याच योजनेमध्ये खर्चात झालेला वाढीव खर्च भागविण्यासाठी वापरता येईल. मात्र, कोणत्याही परिस्थितीत राज्य शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय एका योजनेसाठी मंजूर झालेला निधी अन्य प्रयोजनासाठी नगर परिषदेस परस्पर वळता करता येणार नाही.आढावा घेण्याचे निर्देशसदर आदेश निर्गमित होण्यापूर्वी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी राज्यशासनाने मंजूर केलेल्या योजनेमधील निधी अन्य खात्याकडे कायमस्वरुपी वळवले असेल तर त्याबाबतचा आढावा घेऊन अशा रकमा तातडीने मूळ योजनेच्या खात्याकडे वळत्या करण्याची कार्यवाही पूर्ण करावी. ज्या ठिकाणी मंजूर योजनेमधील निधी अन्य योजनेकडे कर्जाच्या स्वरुपात वळता करण्यात आलेला असेल त्या ठिकाणी अशा कर्ज स्वरुपात वळत्या केलेल्या रकमा मूळ योजनेच्या खात्यावर तातडीने पुन्हा वर्ग करण्यात याव्यात.