शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
2
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
3
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
4
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
5
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
6
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
7
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
8
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
9
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
10
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
11
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
12
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
13
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
14
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
15
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
16
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
17
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
18
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
19
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
20
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
Daily Top 2Weekly Top 5

४० हजार हेक्टर जमीन दलालांच्या घशात

By admin | Updated: December 18, 2014 22:47 IST

ब्रिटिशकालापासून सार्वजनिक मालमत्ता असलेल्या शासकीय जागांना अतिक्रमणाचे ग्रहण लागले आहे. जिल्ह्यातील १४ तालुक्यांमधील ४० हजार हेक्टरच्यावर जमीन अतिक्रमणाच्या विळख्यात अडकली आहे.

सातबारात नोंदविली नावे : गायरान, मंदिरांच्या जमिनी हडपण्याचा सपाटा
गजानन मोहोड - अमरावती
ब्रिटिशकालापासून सार्वजनिक मालमत्ता असलेल्या शासकीय जागांना अतिक्रमणाचे ग्रहण लागले आहे. जिल्ह्यातील १४ तालुक्यांमधील ४० हजार हेक्टरच्यावर जमीन अतिक्रमणाच्या विळख्यात अडकली आहे. गावातील मंदिराच्या जमिनी, गायरान जमिनी तसेच कुळाच्या जमिनींच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार महसूल विभागातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने गत तीन वर्षांत युद्धस्तर पार पडले आहे व ही सर्व जमीन आर्थिक व्यवहारात दलालांच्या घशात अडकल्याची धक्कादायक माहिती आहे.
ब्रिटिशकाळापासून प्रत्येक गावात सार्वजनिक उत्सवासाठी जागा आरक्षित असते. तसेच स्मशानभूमी, सार्वजनिक मंदिर, पाणीपुरवठा, दवाखाना, शाळा बांधकाम आदी सार्वजनिक कामासाठी ग्रामपंचायतींमध्ये या जागांची नोंद आहे. या जागांच्या संरक्षणाची जबाबदारी ग्रामपंचायतीकडे आहे. मात्र या सार्वजनिक जागेवर अतिक्रमण करून ग्रामपंचायतीच्या आठ ‘अ’ मध्ये नोंदणी करण्याचे प्रकार घडत आहे. विशेष म्हणजे अशा जागांवर अनधिकृत बांधकाम करून ही जागा अनेक गावांतील राजकीय व्यक्तींनी आपल्या नावे किंवा आपल्या संस्थांच्या नावे करून घेतली आहे. गावातील गुरे चरण्यासाठी प्रत्येक गावात गायरान जंगल आहेत.
अनेक वर्षांपासून ही जमीन मशागत करून वापरण्याचे कारनामे गावागावांत होत आहे. विशेषत: तलाठी वर्गाला याची माहिती आहे. अशा महत्त्वाच्या जमिनी स्वत:च्या नावे करण्यात आलेली आहे. यामुळे शासन तिजोरीला लाखोंचा चुना लावत आहे. सातबाऱ्यावर भोगवटदार एक अशी नोंद करुन पुन्हा संबंधित अधिकाऱ्यांच्या सहकार्याने विक्रीचा गोरखधंदा सुरू आहे. कमी श्रमात कोट्यवधींची कमाई होणाऱ्या अशा या व्यवसायात एजेंटांनी महसूल अधिकारी, कर्मचारी, तलाठी, ग्रा.पं.चे पदाधिकाऱ्यांना हाताशी धरुन हजारो हेक्टर जमीन घश्यात घातली.