शहरं
Join us  
Trending Stories
1
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
2
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
3
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
4
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
5
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिक्कीमच्या तरूणांसोबत खेळला फुटबॉल, PHOTOSची रंगली चर्चा
6
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
7
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
8
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
9
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
10
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
11
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
12
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
13
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
14
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
15
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
16
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
17
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
18
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
19
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
20
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

२.५ लाख शेतकरी कर्जापासून वंचित?

By admin | Updated: April 11, 2017 00:30 IST

कर्जमाफीसाठी होत असलेल्या संघर्षामुळे बँकाची कर्जवसुली सर्व स्तरावर प्रभावित झाली आहे.

कर्जमाफीच्या चर्चेचे ‘साईड इफेक्ट्स’ : बँकांची वसुली प्रभावित, १२६८ कोटी रुपये थकीतअमरावती : कर्जमाफीसाठी होत असलेल्या संघर्षामुळे बँकाची कर्जवसुली सर्व स्तरावर प्रभावित झाली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात अडीच लाख शेतकरी थकबाकीदार झाल्याने यंदाच्या खरिपासाठी पुन्हा कर्ज मिळण्याची शक्यता नाही. यावर शासनाने तोडगा न काढल्यास हे सर्व शेतकरी पीककर्जापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात ४ लाख १५ हजार शेतकरी खातेदार आहेत. यापैकी १ लाख ६० हजार शेतकऱ्यांना मागील वर्षी खरिपाचे पीककर्जवाटप करण्यात आले. यापैकी किमान एक लाख शेतकऱ्यांनी कर्जाचा भरणा केला नाही. त्यामुळे हेसर्व शेतकरी थकबाकीदार होणार आहेत. आणखी दोन महिन्यांपर्यंत याशेतकऱ्यांना मागील कर्ज भरता येते व नव्याने कर्जास पात्र होता येते. मात्र, त्यांना काही सवलतींना मुकावे लागणार आहे. यासह ३१ मार्चपूर्वी मध्यम व दीर्घमुदती कर्जाचेदेखील एक लाख ६७ हजार ४२६ शेतकरी थकबाकीदार आहेत. अशा जवळपास अडीच हजार शेतकऱ्यांनी थकीत कर्जाचा भरणा केला नाही. त्यामुळे यंदाच्या खरीप कर्जापासून ते वंचित राहण्याची शक्यता आहे. विधिमंडळ सभागृह ते गावपातळीपर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी संघर्ष सुरू आहे. त्यामुळे आता कर्जमाफी होणारच, याआशेवर शेतकऱ्यांनी कर्जाचा भरणा केला नाही. किंबहुना शेतमालास हमी इतकाही भाव नाही. यामुळे उत्पादनखर्च देखील निघाला नाही. त्यामुळे शेतकरी प्रचंड आर्थिक कोंडीत आहे. त्याला कर्जमाफीच्या चर्चेचे बळ मिळाल्याने बँकांची वसुली प्रभावित झाली. शेतकरी थकबाकीदार असल्याने बँका त्यांना कर्ज देण्यास उघडपणे नकार देत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना नव्याने कर्ज मिळण्यास अडचणी निर्माण होत आहेत. यापार्श्वभूमीवर जिल्ह्यात दोन लाखांवर शेतकरी कर्जापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)अकोल्यात तोडगा, जिल्ह्यात केव्हा ?अकोला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी थकबाकीदार आहेत. त्यामुळे अकोला जिल्हा बँकेने थकीत कर्जाच्या व्याजाचा भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना खरीप कर्जाचे वाटप करण्याचा प्रस्ताव ठेवला व त्याला मान्यता मिळाली. जिल्ह्यातदेखील जिल्हा सहकारी बँकेने याच निर्णयाचा कित्ता गिरवावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. मागीलवर्षीपेक्षा २०४.६८ कोटींनी लक्ष्यांक कमीजिल्ह्यात यंदाच्या खरीप व रबी कर्जवाटपासाठी १९४१ कोटींचा लक्ष्यांक आहे. मागील वर्षी २१४५.६८ कोटींचा लक्ष्यांक होता. त्यातुलनेत यंदा २०४.६८ कोटींचा लक्ष्यांक कमी आहे. वास्तविक दरवर्षी लक्ष्यांकात किमान १० टक्के वाढ गृहित धरली जाते. यंदा मात्र शेतकऱ्यांचे कर्ज मोठ्या प्रमाणात थकीत असल्याने कर्जवाटपाच्या सुरुवातीलाच बँकांनी नन्नाचा पाढा वाचल्याने लक्ष्यांक कमी केल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्जासाठी अडचणी उद्भवणार आहेत. यासाठी वरिष्ठ स्तरावर संवाद सुरू आहे. लवकरच यावर तोडगा निघेल. ३१ मेपूर्वी कर्जवाटपाच्या सूचना आहेत.- गौतम वालदे,जिल्हा उपनिबंधक