शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
6
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
7
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
11
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
12
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
13
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
14
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
15
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
16
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
17
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
18
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
19
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
20
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात लसीकरणानंतर दोघांना रिॲक्शन! दोन्ही कर्मचाऱ्यांची प्रकृती स्थिर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2021 05:33 IST

जिल्ह्यात शनिवारी कोविड लसीकरण यशस्वीपणे पार पडले. पहिल्यांदाच कोविडची लस घेणार असल्याने काही कर्मचाऱ्यांमध्ये धाकधुकीचे वातावरण होते, मात्र काही वेळातच सर्वांनी न घाबरता लस घेतली. लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण होईस्तोवर सर्वकाही सुरळीत होते.

अकोला : कोविड लसीकरणाला जिल्ह्यात सकारात्मक वातावरणात सुरुवात झाली, मात्र लसीकरणाच्या दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी दोन महिला कर्मचाऱ्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. या दोन्ही महिला कर्मचाऱ्यांवर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. लसीकरणानंतर ही लक्षणे सामान्य असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नसल्याचेही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.जिल्ह्यात शनिवारी कोविड लसीकरण यशस्वीपणे पार पडले. पहिल्यांदाच कोविडची लस घेणार असल्याने काही कर्मचाऱ्यांमध्ये धाकधुकीचे वातावरण होते, मात्र काही वेळातच सर्वांनी न घाबरता लस घेतली. लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण होईस्तोवर सर्वकाही सुरळीत होते. मात्र, लसीकरणाच्या दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी दोन महिला कर्मचाऱ्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याची माहिती समोर आली. यातील एक महिला वैद्यकीय कर्मचारी असून, त्यांना थंडी वाजून ताप आला, तर दुसरी महिला आशासेविका असून, त्यांना थकवा आल्याचे सांगण्यात येत आहे. दोघांनाही तत्काळ सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दोन्ही महिला कर्मचारी ३० ते ३४ वर्षे वयोगटातील असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दोन्ही महिला कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांचे म्हणणे आहे.इतरही लोकांना ‘रिॲक्शन’ -या दोन महिला कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त ज्या लाभार्थ्यांनी लस घेतली, अशा आणखी काहींना रविवारी लसीची रिॲक्शन झाल्याची माहिती समोर आली आहे. वैद्यकीय सूत्रांच्या मते लस घेणाऱ्या व्यक्तींना हलका ताप, अंगदुखी, लस घेतलेल्या जागी दुखणे अशी सौम्य लक्षणे आढळून आली. या प्रकारची सौम्य लक्षणे येणे साहजिक असून, नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नसल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. ‘फिव्हर’ हा लसीकरणाचा एक भाग आहे. इतर लसीकरणामध्येही या प्रकारची सौम्य लक्षणे आढळतात. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. औषधोपचाराने कर्मचाऱ्यांची प्रकृती स्थिर आहे. घाबरण्याचे कारण नाही.- डॉ. आरती कुलवाल, वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा स्त्री रुग्णालय, अकाेला

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोलाdoctorडॉक्टर