शहरं
Join us  
Trending Stories
1
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
2
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
3
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
4
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
5
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिक्कीमच्या तरूणांसोबत खेळला फुटबॉल, PHOTOSची रंगली चर्चा
6
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
7
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
8
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
9
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
10
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
11
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
12
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
13
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
14
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
15
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
16
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
17
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
18
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
19
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
20
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘आत्मा’ची नोकरभरती करणार खाजगी संस्था!

By admin | Updated: May 6, 2015 00:58 IST

राज्यातील हजारो कंत्राटी कर्मचा-यांवर अन्याय.

अकोला : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेत (आत्मा) काम करणार्‍या कंत्राटी कर्मचार्‍यांची नोकरभरती आता खासगी संस्थाद्वारे करण्यात येणार असल्याचे संकेत असल्याने सध्या आत्मा अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे. हे नवे संकट असल्याचे वाटत असल्याने या कर्मचार्‍यांनी संघटनेच्या माध्यमातून या आदेशाच्या विरोधात आवाज उठविण्याचे ठरवले आहे. राष्ट्रीय कृषी धोरणामध्ये कृषी विस्तारातील क्रांतिकारी बदलांची गरज प्रामुख्याने समोर आल्याने कृषी विभागाच्या ह्यआत्माह्ण यंत्रणेला सर्वाधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. त्या माध्यमातून आत्मा यंत्रणेमार्फत शासनाच्या विविध योजना शेतकर्‍यांपर्यंत पोहचविण्यात यश आले आहे. शेतकरी गट, नावीन्यपूर्ण प्रात्यक्षिके, शेतकरी प्रशिक्षण, शेतीशाळा, शेतीपूरक व्यवसाय, कृषी प्रदर्शन, धान्य महोत्सव, थेट शेतमाल विक्री याचा शेतकर्‍यांना चांगला फायदा होत आहे. यासाठी या महाराष्ट्रात आजमितीस एक हजारांवर कंत्राटी कर्मचारी हे काम करीत आहेत. आजवर या कर्मचार्‍यांची नियुक्ती कृषी विभागानेच केली आहे, पण आता या नियुक्त्या बाह्य स्रोताद्वारे करण्याचा निर्णय शासनाच्या कृषी विभागाने घेतला आहे. यामध्ये विभागीय कृषी सहसंचालक स्तरापर्यंतच्या कंत्राटी नियुक्त्या विभागीय कृषी सहसंचालक स्तरावर एकत्रित मागणी घेऊन त्यानुसार यापुढे कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्याऐवजी बाहय़स्रोताद्वारे करण्यात याव्यात आणि बाहय़ स्रोताद्वारे नियुक्ती करताना अनुसूचित जाती, जमाती अधिनियमातील तरतुदीनुसार बिंदुनामावली तयार करू न त्यानुसार कार्यवाही करावी, असा आदेश ९ एप्रिल रोजी कृषी, पशुसंर्वधन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय विभागाच्या अवर सचिवांनी काढला. त्यामुळे आत्माच्या कंत्राटी कर्मचार्‍यांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. या यंत्रणेत काम करणार्‍या हजारो कंत्राटी कर्मचार्‍यांवर अन्याय होत असल्याची भावना निर्माण झाली आहे.