शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

अकोला जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनचे मूल्यांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 11:00 AM

Akola Police प्रत्येक पोलीस स्टेशनच्या कामकाजाची माहिती घेऊन त्यांचे मूल्यांकन करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांचा उपक्रमपोलीस ठाण्याचे कामकाज सुधारण्यासाठी मूल्यांकन पद्धत

- सचिन राऊत

अकोला : जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनचे कामकाज सुधारण्यासाठी तसेच कामकाज गुणवत्तापूर्ण पद्धतीने होण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या संकल्पनेतून आता प्रत्येक पोलीस स्टेशनचे मूल्यांकन सुरू करण्यात आले असल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. दर महिन्याला हे मूल्यांकन करण्यात येणार आहे.पोलीस ठाण्यांमध्ये येणाऱ्या तक्रारदारांचे समाधान करण्यासाठी तसेच गुणवत्तापूर्ण सेवा पोलीस खात्याकडून प्रदान व्हावी या उद्देशाने जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनच्या कामकाजाची माहिती घेऊन त्यांचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या अंतर्गत एक पथक कार्यान्वित करून ते पोलीस ठाण्याचे मूल्यांकन करणार आहे. यामध्ये पोलीस स्टेशनच्या स्तरावरील कामगिरीचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. यामध्ये गुन्हे नियंत्रण, गुन्हे प्रकटीकरण, कायदा व सुव्यवस्था अंमलबजावणी, कम्युनिटी पोलिसिंग, सीसीटीएनएसचा पोलीस कामकाजामध्ये यथोचित उपयोग करून घेणे व सीसीटीएनएसचा वापर हा पोलीस प्रशासनाकडून कशाप्रकारे करण्यात येत आहे, या सर्व बाबींचे मूल्यांकन हे पथक करणार आहे. गुन्हे शोध व प्रतिबंधात्मक कारवाई करून गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवणे या सर्व कामगिरीवर त्या पोलीस स्टेशनला प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे तीन क्रमांक देण्यात येणार आहेत. पोलीस स्टेशनचे प्रशासन कशाप्रकारे काम करत आहे, या सर्व कामकाजाचा अभ्यास करून त्यांचे मूल्यांकन करून त्यांना कामकाजानुसार क्रमांक देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. या पोलीस ठाण्यांची कामगिरी अव्वलजिल्ह्यातील २३ पोलीस ठाण्यांचे सप्टेंबर महिन्यात मूल्यांकन करण्यात आले. यामध्ये सप्टेंबर महिन्यात मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशन, बार्शीटाकळी पोलीस स्टेशन व अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचा अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक आले आहेत. याप्रमाणे दर महिन्यात ही मूल्यांकन पद्धत सुरूच राहणार असल्याची माहिती आहे.

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिस