शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
2
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
3
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
4
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
5
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
6
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
7
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
8
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
9
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
10
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
11
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
12
मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच, पण डझनभर गाड्यांचा ताफा...; जयंत पाटील यांची टिप्पणी
13
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
14
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
15
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
17
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
18
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
19
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
20
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य डाकघरातील कोअर बँकिंग प्रणाली गुरुवारपासून ग्राहकांच्या सेवेत - ४ जूनला दिवसभर आर्थिक व्यवहार बंद राहणार

By admin | Updated: June 3, 2014 01:57 IST

अकोला शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मुख्य डाकघरात येत्या गुरुवार, ५ जूनपासून कोअर बँकिंग प्रणाली कार्यान्वित होत आहे. सदर प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी बुधवार, ४ जून रोजी मुख्य डाकघरातील आर्थिक व्यवहार बंद राहणार असल्याची माहिती प्रवर डाकघर अधीक्षकांनी दिली.

अकोला : शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मुख्य डाकघरात येत्या गुरुवार, ५ जूनपासून कोअर बँकिंग प्रणाली कार्यान्वित होत आहे. सदर प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी बुधवार, ४ जून रोजी मुख्य डाकघरातील आर्थिक व्यवहार बंद राहणार असल्याची माहिती प्रवर डाकघर अधीक्षकांनी दिली.
अकोल्यातदेखील पोस्टाची कोअर बँकिंग प्रणाली सुरू होणार हे ऐकून, वाचून असलेल्या पोस्टाच्या ग्राहकांसाठी खूशखबर असून, चुटकीसरशी आर्थिक व्यवहार करणारी ही प्रणाली येत्या गुरुवारपासून येथील मुख्य डाकघरात कार्यान्वित करण्यात येत आहे. पोस्टाचे बचत खाते वापरणार्‍या ग्राहकांना यामुळे अकोल्यातून आर्थिक व्यवहार करणे अधिक सोईस्कर होणार आहे. संपूर्ण राज्यातील डाकघरांमध्ये ही कार्यप्रणाली कार्यान्वित करण्यासाठी टप्प्याटप्प्याने कार्य सुरू करण्यात आले आहे. सदर कार्यप्रणाली कार्यन्वित करताना तांत्रिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता असल्याने बुधवार, ४ जून रोजी येथील मुख्य डाकघरातील बहुतांश आर्थिक व्यवहार संपूर्ण दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रवर डाकघर अक्षीकांनी दिली.