शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
2
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
3
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
4
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
5
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
6
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
7
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
8
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
9
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
10
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
11
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
12
मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच, पण डझनभर गाड्यांचा ताफा...; जयंत पाटील यांची टिप्पणी
13
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
14
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
15
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
17
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
18
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
19
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
20
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
Daily Top 2Weekly Top 5

मृगाच्या पहिल्या पावसाचा अनेक गावांना तडाखा

By admin | Updated: June 14, 2014 23:31 IST

मृगाच्या पहिल्याच पावसाने सोबत आणलेल्या वादळात पातूर परिसरातील गावांची पार दैना करून टाकली.

अकोला : मृगाच्या पहिल्याच पावसाने सोबत आणलेल्या वादळात पातूर परिसरातील गावांची पार दैना करून टाकली. मंगळवारी रात्री घरावरील पत्रे उडाले, त्यामुळे अनेक कुटुंबे उघड्यावर आली. या वादळाने अनेक कुटुंबांना तडाखा दिला, तर अनेकांना जखमी केले. काही वृक्ष अध्र्यातून तुटले, तर काही उन्मळून पडले, विजेचे खांब तुटले, तारा जमिनीवर आल्या. बाळापुरात उपविभागीय अधिकारी यांच्या बंगल्यावरील व महामार्गावरील पोलिस चौकीचे टिनपत्रे उडाली. पोलिस वायरलेस संचही जळाला. अनेक गावात विद्युत पुरवठा बंद झाला. परिसरातील शेतकरी आधीच नापिकीमुळे खचून गेले आहेत. अशातच वादळी पावसाचा तडाखा बसल्याने यावर्षाची सुरुवातच धक्कादायक झाल्याची भावना शेतकर्‍यांनी व्यक्त केली. पातूर तालुका प्रतिनिधी शंकर नाभरे यांनी दिलेल्या माहितीनुसार या पावसाने दिग्रस, खामखेड,आगीखेड, अंधारसांगवी, भंडारज, बोडखा, देऊळगाव, माळराजुरा, सावरगाव, तुलंगा खुर्द, कोठारी, आष्टुल पाष्टुल, खानापूर, कारला, पिंपळडोळी, तुळजापूर, ओंझळवाडी या गावांना पावसाचा तडाखा बसला. काही गावातील घरांची पडझड झालीआहे. टिनपत्रे उडून गेल्याने अनेकांचा संसार रस्त्यावर आला आहे. दिग्रस परिसरात मोठाली वृक्षे उन्मळून पडली असल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे, तसेच घरांच्या पडझडीचे पंचनामे करण्यास प्रशासनाने आदेश दिले आहेत. कालच्या वादळी पावसाने वानरांची मोठी धावपळ झाली. सतत तीन तास पाऊस सुरू असल्याने वन्यप्राणी सैरभैर झालेत. या पावसामुळे शेतातील कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. मूर्तिजापूर प्रतिनिधी दीपक अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील लाखपुरी, सिरसो, माना, कुरू म, जामठी, अनभोरा, दहातोंडा, सांगवी खुर्द, रेपाटखेड या गावांना तुरळक फटका बसला, तर शेलुबोंडे, भटोरी, पारद या परिसरात जास्त पाऊस झाला. लोकांच्या घरावरील टिनपत्रे उडून गेलीत. तालुक्यात मोठे नुकसान झालेले नाही. बाळापूर प्रतिनिधी अनंत वानखडे यांनी सांगितले की, शेगाव रोड परिसरात जास्त पाऊस झाला. एसडीओ कार्यालय, पोलिस चौकीला वादळी पावसाचा फटका बसला. रस्त्यावर वृक्ष उन्मळून पडल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला होता; मात्र प्रशासनाने वाहतूक पूर्ववत केली. विजेचे खांब वाकल्याने तालुक्यातील अनेक गावात वीजपुरवठा खंडित झाला आहे. बार्शिटाकळी प्रतिनिधी जेठाभाई पटेल यांनी दिलेल्या महितीनुसार तालुक्यातील मोरेश्‍वर सिंदखेड, धाबा, लोहगड, एरंडा, जुनना, खेर्डा भागई, काजळेश्‍वर, निहिदा, पिंपळगाव चांभारे, पुनोतीखुर्द, परंडा, पाटखेड, वरखेड या गावाला तडाखा बसला.