शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
4
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
5
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
6
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
7
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
8
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
9
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
10
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
11
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
12
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
13
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
14
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
15
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
16
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
17
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
18
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
19
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
20
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
Daily Top 2Weekly Top 5

अकोट : भाजप-काँग्रेसमध्ये बंडखोरी टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 12:55 IST

अकोट विधानसभा मतदारसंघ बंडखोरी टाळण्यास भाजपा व काँग्रेस या पक्षाला यश आले.

- विजय शिंदे  लोकमत न्यूज नेटवर्कअकोट: विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अकोट विधानसभा मतदारसंघ बंडखोरी टाळण्यास भाजपाकाँग्रेस या पक्षाला यश आले; मात्र महायुतीतील शिवसेना पक्ष व वंचित बहुजन आघाडीतील इच्छुक उमेदवारांनी बंडाचे निशाण फडकविले. अकोट मतदारसंघात सध्यातरी चौरंगी लढतीचे वारे वाहू लागले आहे.अकोट मतदारसंघात २२ उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये प्रामुख्याने भाजपच्या महायुतीचे प्रकाश भारसाकळे, काँग्रेसचे संजय बोडखे, वंचित बहुजन आघाडीचे संतोष रहाटे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रवींद्र फाटे, प्रहार जनशक्ती पक्षाचे तुषार फुंडकर यांच्यासह विविध उमेदवारांचा समावेश आहे. अकोट मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत असल्याने स्थानिक व विकासाच्या मुद्यावरून मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याची शक्यता वर्तविली जात होती; परंतु नामांकन अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत भाजपा व काँग्रेस या पक्षांमधील अन्य प्रभावी नेता पदाधिकाऱ्याने बंडखोरी करीत अपक्ष अर्ज दाखल केला नाही. प्रकाश भारसाकळे विद्यमान आमदार असताना अनेक इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती; परंतु पक्षाने भारसाकळे यांना पुन्हा उमेदवारी दिली. त्यामुळे भाजपमध्ये बंडखोरी होऊ नये म्हणून पक्षश्रेष्ठींनी प्रारंभीपासून वातावरण हाताळल्याने यशस्वी झाले तर काँग्रेसमध्ये बोडखे व गणगणे परिवारातील कोणत्या युवा नेतृत्वाला संधी मिळणार, याकरिता दोन्ही कुटुंब मुंबई-दिल्लीत ठाण मांडून होते; परंतु गणगणे कुटुंबीयातील महेश गणगणे यांनी या निवडणुकीतून यशस्वी माघार घेतल्याने संजय बोडखे यांचा मार्ग सुकर झाला. हे दोन्ही कुटुंब काँग्रेसच्या विजयासाठी मनापासून एकत्र येतात का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. अकोट मतदारसंघ शिवसेनेकडे राहावा, यासाठी या परिसरात शिवसेना पदाधिकाऱ्यांची अख्खी फौज मुंबईत तळ ठोकून होती; परंतु हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आला. निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर अनिल गावंडे यांनी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवबंधन बांधून प्रवेश केला होता; परंतु हा मतदारसंघ भाजपाकडे गेल्याने अनिल गावंडे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करीत बंडखोरी केली आहे. वंचित बहुजन आघाडीने सर्वात शेवटी उमेदवार जाहीर केला असला तरी वंचितच्या शोभा शेळके यांनी अपक्ष अर्ज दाखल करुन बंडाचे संकेत दिले आहेत. या प्रमुख उमेदवारांमुळे मतदारसंघात बहूरंगी लढतीचे चित्र दिसत असून अर्ज मागे घेण्याच्या दिवसानंतर लढाईचे चित्र आणखी स्पष्ट होईल.

टॅग्स :akot-acअकोटMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाcongressकाँग्रेस