शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
2
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
3
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
4
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
5
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
6
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
7
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
8
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
9
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
10
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
11
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
12
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
13
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
14
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
15
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
16
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
17
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
18
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
19
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
20
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
Daily Top 2Weekly Top 5

अकोला मनपा कर्मचार्‍यांची वाहने रस्त्यावर

By admin | Updated: July 20, 2014 02:01 IST

वाहतुकीला अडथळा; अतिक्रमकांना अभय.

अकोला : महापालिका कर्मचार्‍यांची वाहने मनपा आवारात न ठेवता, रस्त्यावर उभी केली जात असल्यामुळे गांधी मार्गावरील वाहतूक व्यवस्था विस्कळीत होत आहे. प्रशासनाकडून नियोजनाचा अभाव व अतिक्रमकांची पाठराखण होत असल्याने ही समस्या निर्माण झाल्याचे चित्र आहे.
महापालिका आवारात दुचाकीसह चारचाकी वाहने ठेवली जातात. यामध्ये मनपा कर्मचार्‍यांसह नगरसेवकांचा समावेश आहे; परंतु गांधी मार्गावरील बाजारपेठेत खासगी कामासाठी येणारे नागरिकसुद्धा त्यांची वाहने मनपा आवारात ठेवतात. यामुळे मनपात प्रचंड वर्दळ सुरू असते. मनपा कर्मचार्‍यांना शिस्त लावणे व मनपा आवारातील वाहनांची वर्दळ कमी होण्याच्या उद्देशातून उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी कर्मचार्‍यांची वाहने मनपाच्या बाहेर आवारभिंतीलगत ठेवण्याचे निर्देश दिले. मनपाच्या आवारभिंतीलगत हातगाडीवर रेडीमेड ड्रेस विक्री करणार्‍या अतिक्रमकांनी ठाण मांडले आहे.
या अतिक्रमकांना हटवून या ठिकाणी वाहने उभी करण्याचे निर्देश उपायुक्तांनी अतिक्रमण विभाग व सुरक्षा रक्षकांना दिले. त्यानुषंगाने कर्मचार्‍यांची वाहने आवारभिंतीलगत ठेवली जात आहेत; परंतु याठिकाणी अतिक्रमकांचा ठिय्या कायम असल्याने मनपा कर्मचार्‍यांना नाईलाजाने त्यांची वाहने रस्त्यावर ठेवावी लागत आहेत. परिणामी गांधी मार्गावरील वाहतूक व्यवस्था पूर्णत: विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. ही बाब १९ जुलै रोजी मनपा आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या लक्षात येताच त्यांनी आवारभिंतीलगतचे अतिक्रमण हटविण्याच्या सूचना अतिक्रमण विभागासह सुरक्षा रक्षकांना दिल्या.