शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षेला उपस्थित असल्यावरही दाखविले अनुपस्थित

By admin | Updated: August 28, 2015 23:52 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील प्रकार; विद्यार्थ्यांची तक्रार.

अकोला : येथील एलआरटी विज्ञान महाविद्यालयात एम.कॉम.चे शिक्षण घेत असलेल्या तीन विद्यार्थ्यांना दुसर्‍या सत्राच्या परीक्षेत उपस्थित असल्यावरही गुणपत्रिकेत अनुपस्थित दाखविले आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने हा प्रताप केला असून, विद्यार्थ्यांंनी या संबंधी राष्ट्रीय युवाशक्ती संघटनेकडे तक्रार केली असून, संघटनेने आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. राष्ट्रीय युवाशक्ती संघटनेचे अध्यक्ष विमल जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या एम.कॉम.चा निकाल नुकताच जाहीर झाला असून, यामध्ये विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत एका विषयात अनुपस्थित दाखवून अनुत्तीर्ण केले आहे. हे विद्यार्थी या परीक्षेला उपस्थित असल्याचे प्रमाणपत्रसुद्धा महाविद्यालयाने दिले आहे. विद्यार्थिनी मोक्षा शाह हिने २0१३ मध्ये परीक्षा दिली असता तिला अनुपस्थित दाखविण्यात आले. त्यावेळी सदर विद्यार्थिनीने विद्यापीठात जाऊन संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना भेटून या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती केली होती. सदर विद्यार्थिनीने २७ एप्रिल २0१५ रोजी एमकॉम द्वितीय सत्रातील ह्यकॉर्पोरेट टॅक्स प्लॅनिंग अँन्ड मॅनेजमेंटह्ण या विषयाचा पेपर श्री शिवाजी महाविद्यालय अकोला या परीक्षा केंद्रावर दिला. मात्र, १२ जुलै रोजी आलेल्या निकालात पुन्हा तिला अनुपस्थित दाखविण्यात आले. मोक्षा शाह या पेपरला उपस्थित असल्याचे प्रमाणपत्र शिवाजी महाविद्यालयाने दिले आहे. तसेच एम.कॉम. द्वितीय (जुना अभ्यासक्रम) ची विद्यार्थिनी ममता गोंडचवर हिने २७ एप्रिल २0१५ रोजी श्री शिवाजी महाविद्यालयात पेपर दिला होता. तिलाही या पेपरला अनुपस्थित असल्याचे गुणपत्रिकेत दाखविण्यात आले आहे. सदर प्रकार अत्यंत गंभीर असून, यातून विद्यापीठाचा भोंगळ कारभार निदर्शनास येत असल्याचा आरोप विमल जैन यांनी केला आहे. तसेच या विद्यार्थ्यांंना त्वरित न्याय मिळाला नाही तर आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.