शहरं
Join us  
Trending Stories
1
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
2
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
3
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
4
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
5
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिक्कीमच्या तरूणांसोबत खेळला फुटबॉल, PHOTOSची रंगली चर्चा
6
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
7
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
8
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
9
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
10
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
11
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
12
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
13
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
14
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
15
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
16
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
17
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
18
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
19
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
20
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणुकीनंतर ३५ हजार मतदार वाढले!

By admin | Updated: August 5, 2014 00:55 IST

जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार याद्या जाहीर

अकोला : जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार पाचही विधानसभा मतदारसंघातील मतदारांची संख्या १४ लाख १३ हजारांवर पोहोचली आहे. गेल्या ९ जूनपूर्वी जिल्ह्यातील आकोट, अकोला पश्‍चिम, अकोला पूर्व, बाळापूर आणि मूर्तिजापूर या पाचही विधानसभा मतदारसंघातील मतदारांची एकूण संख्या १३ लाख ७८ हजार ३४७ एवढी होती. गेल्या ९ ते ३0 जूनदरम्यान मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. त्यामध्ये नवीन मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली. तसेच चुकीची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली. जिल्ह्यातल्या पाचही विधानसभा मतदारसंघातील अद्ययावत मतदार याद्या ३१ जुलै रोजी जिल्हा प्रशासनामार्फत जाहीर करण्यात आल्या. त्यानुसार पाचही विधानसभा मतदारसंघात ३४ हजार ८९0 मतदारांची वाढ झाली असून, जिल्ह्यातील मतदारांची संख्या १४ लाख १३ हजार २३७ इतकी झाली आहे. ८४ टक्के क्षेत्रावरील पेरण्या आटोपल्या! अकोला : आजमितीस अकोला जिल्हयाती ८४ टक्के क्षेत्रावरील पेरण्या आटोपल्या आहेत; परंतु पावसाने पुन्हा दीर्घ विश्रांती घेतल्याने उर्वरित क्षेत्रावरील पेरण्यांची गती मंदावली आहे. या विभागात सर्वाधिक १२ लाख ९८ हजार १00 हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. आता या विभागातील शेतकर्‍यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक ९१ टक्के क्षेत्रावर शेतकर्‍यांनी पेरणी केली आहे. अमरावती ८६ टक्के, वाशिम ८३ टक्के, अकोला ८४ व बुलडाणा जिल्ह्यात ७४ टक्के क्षेत्रावर पेरणी आटोपली आहे. यावर्षी सोयाबीनचा पेरा घटण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. तथापि, मागील वर्षीपेक्षा हे क्षेत्र कमी असले तरी शेतकर्‍यांनी यावर्षी प्रथम पसंती सोयाबीनलाच दिली आहे. कापसाचा पेराही वाढला असून, या पाच जिल्हय़ात कापसाचे क्षेत्र यावर्षी ८ लाख ९९ हजार ४00 हेक्टरपर्यंत पोहोचले आहे. तुरीचे क्षेत्रदेखील वाढले असून, ३ लाख ५ हजार हेक्टरवर तूर पेरणी झाली आहे. तथापि, यावर्षी मूग पेरणीची वेळ निघून गेली असतानाही या पाच जिल्हय़ात ५६ हजार २00 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. उडिदाची पेरणी घटली असून, २४,४00 हेक्टर क्षेत्रावर या पिकाचा पेरा शेतकर्‍यांनी केला आहे. ज्वारीची ६८,६00 हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे.